शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

साताऱ्यात नवीन महाबळेश्वरची निर्मिती; आचारसंहिता संपताच प्रारूप विकास योजनेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:11 AM

राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते

अमर शैला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाशेजारीच नवीन महाबळेश्वर गिरीस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाने गती घेतली आहे. या प्रकल्पातील २३५ गावांपैकी ५८ गावांचा बेस मॅप आणि भूवापर नकाशा तयार झाला आहे. तर उर्वरित १७७ गावांचा लिडार सर्व्हे आणि जमीन पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच आता प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) सुरुवात केली जाणार आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती केली होती.

राज्यातील प्रमुख गिरीस्थानांमध्ये समावेश असलेल्या महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी पसंती असते. त्यातून येथील पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने महाबळेश्वरवर येणारा ताण कमी करण्यासाठी नवीन गिरीस्थान विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती. कोयना बॅक वॉटर आणि परिसरातील तब्बल २३५ गावांचा विकास साधून नवीन महाबळेश्वर बसविले जाणार आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील ३४, पाटण तालुक्यातील ९५, जावळी तालुक्यातील ४६ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्पात करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सुमारे ७४८ चौरस किमी क्षेत्रासाठी ही योजना तयार केली जात असून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपासून ते महाबळेश्वरपर्यंत हा परिसर विस्तारला आहे. सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. या भागातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. तसेच कोयनेचे बॅकवॉटर आहे. यामुळे हा परिसर हिरवागार आणि नयनरम्य आहे. त्याचबरोबर घनदाट जंगल, वन्यजीव, धबधबे, तलाव, ऐतिहासिक वास्तू यांची मोठी देण लाभली आहे. परिणामी गिरीस्थान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने हा परिसर परिपूर्ण आहे.

आराखड्यात समाविष्ट घटक

  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण, संवर्धन आणि जीर्णोद्धार.
  • राखीव जागा, वन्यजीव अभयारण्ये आणि संवेदनशील स्थळांभोवती बफर झोन किंवा कनेक्टर आणि स्थलांतर कॉरिडॉर तयार करून दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन करणे.
  • कास पठारावर विविध प्रकारच्या मोसमी वन्य फुलांचे आणि स्थानिक फुलपाखरांच्या प्रजातींचे संरक्षण करणे
  • शिव सागर तलाव, उरमोडी, तापोळा, कोयना बॅक वॉटर परिसराला सुपीक हिरवेगार आणि नयनरम्य बनवणे.

प्रकल्पात समाविष्ट गावे

  • सातारा तालुका- ३४
  • पाटण तालुका- ९५
  • जावळी तालुका- ४६
  • महाबळेश्वर तालुका- ६०

या बेस मॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रारूप विकास योजना तयार करण्याबाबतचा इरादा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर विद्यमान जमीन वापर नकाशा, प्रारूप विकास योजना तयार करून नागरिकांच्या हरकती / सूचनांकरिता प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.- अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर