शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या १३ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 6:51 PM

Crimenews Satara : सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून, हे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताना १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

ठळक मुद्देक्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या १३ जणांवर गुन्हा फलटण पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

फलटण : सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून, हे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताना १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.फलटण शहर पोलिसानी गुरुवार, दि. २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खंडोबा मंदिराशेजारी मलटण-फलटण येथे जयकुमार पवार यांच्या दुमजली घरात पहिल्या मजल्यावर मोबाइलवर तसेच रोख स्वरूपात पैसे स्वीकारून आयपीएल क्रिकेट सामन्यावर तसेच मटका घेताना जयकुमार शंकरराव पवार (रा. मलटण-फलटण), वैभव सुनील जानकर (रा. शुक्रवार पेठ फलटण) यांना पकडले. त्या वेळी ते आयपीएल सामन्यावर व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेत असल्याचे आढळले.

चौकशीअंती व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी अमर पिसाळ (रा. मारवाड पेठ फलटण), दत्ता कुंभार (रा. वीटभट्टी जवळमलटण फलटण), सुमित चोरमले (रा. धनगरवाडा, बुधवार पेठ, फलटण), अमित कुरकुटे (रा. उमाजी नाईक, चौक फलटण), अमोल काळे (रा. दत्तनगर, फलटण), संतोष काळे (रा. लक्ष्मीनगर, फलटण), जेबले (पूर्ण नाव माहीत नाही. शंकर मार्केट फलटण), शौकत यासीन शेख (रा. बिरदेवनगर, फलटण), नटराज क्षीरसागर (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांच्याकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा तसेच मटका घेतल्याने या आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जयकुमार पवार ज्याच्या जीवावर सट्टा चालवत होता तसेच पुणे येथील शशांक प्रशांत लांडे याच्यावरही गुन्हा नोंदविला आहे. आत्तापर्यंत जयकुमार पवार, वैभव जानकर, शौकत शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊळ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस