लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : खटाव तालुक्यातील खरीप पीक नुकसान भरपाईच्या निधी वाटपात २ कोटी ९३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार आणि सध्याचे उपजिल्हाधिकारी (जि. नंदूरबार) अमोल कांबळे यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.या अपहार प्रकरणाचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुण्याच्या महसूल आयुक्तांकडे पाठविला होता.
त्यानंतर या अहवालाची पडताळणी होऊन वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली. शुक्रवारी याबाबत संबंधित अधिकारी अमोल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी खटावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना याबाबतचे लेखी आदेश दिले.कांबळे आणि इतर अधिकारी यांनी अनेक तास व्यवस्थित अभ्यास तसेच चर्चा करून फिर्याद दाखल करण्याबाबतचा तक्रार अर्ज तयार केला. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अमोल कांबळे यांच्या विरोधात २ कोटी ९३ लाख रुपयांच्या अपहाराचागुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.बँक अधिकाºयांचे काय होणार?शासकीय खरीप अनुदानातील वजावट करता २ कोटी ९३ लाख १० हजार ८५८ रुपये फरक राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्थांमधून वर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अपहारप्रकरणी अमोल कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत असला तरी घोटाळ्यातील संबंधित बँकांच्या अधिकाºयांचे काय होणार, याकडेही साºयांचे लक्ष लागून राहिले आहे.