वेळे /सातारा : वनपरिक्षेत्रात वनवा लावल्या प्रकरणी वाईचे वनपाल अधिकारी महेश झांजुरणे यांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक 17 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान मौजे आकोशी येथील मालकी क्षेत्रातून धूर दिसून येताच वाशिवली वनपाल रत्नकांत शिंदे, अतिरिक्त कार्यभार प्रदिप जोशी, वासोळे वनरक्षक संदीप पवार, जांभळी हे सर्वजण घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी मौजे अकोशी येथील मालकी क्षेत्रात आरोपी कीर्ती युवराज भणगे (वय 41 वर्षे ) व चंद्रभागा किसन भणगे ( वय 48 दोघी राहणार आकोशी तालुका वाई जिल्हा सातारा) त्यांचे मालकी क्षेत्रात राळा म्हणजेच तरवा भाजत असताना दिसून आले.
सदर मालकी क्षेत्रातून वनवा हा वनक्षेत्राचे दिशेने गेलेला दिसून आला, त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सदरचा वनवा हा आमच्याकडूनच वनक्षेत्राचे दिशेने गेला हे मान्य केले. त्यांनी झालेला गुन्हा कबूल केला आहे.हा वनवा हा वनाधिकारी, कर्मचारी व कृष्णदेव रामचंद्र भणगे, पोलीस पाटील आकोशी यांनी डहाळ्याच्या सहाय्याने व ब्लोअर मशिनच्या सहाय्याने पूर्णपणे विझवला. परंतु तोपर्यंत वनक्षेत्रातील आकोशी कं. नं. 11 पार्ट मधील चार हेक्टर क्षेत्रातील झाड व झाडोरा जळून शासनाचे नुकसान झाले.
आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सदर कामी सातारा उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक भडाळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वाई महेश झांजुरणे, वनपाल वाशिवली अतिरिक्त कार्यभार रत्नकांत शिंदे, वनसंरक्षक वासोळे, प्रदिप जोशी, वनसंरक्षक जांभळी, संदीप पवार यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास चालू ठेवला आहे.