शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

खासगी सावकारी करणाऱ्या दोघांवर कऱ्हाड पोलिसांत गुन्हा

By admin | Published: August 28, 2016 12:02 AM

वाळू ठेकेदाराची फिर्याद : पंधरा लाखांच्या मोबदल्यात चोवीस लाख

कऱ्हाड : पैशांसाठी नजरकैदेत ठेवून दमदाटी केल्याप्रकरणी दोन खासगी सावकारांवर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुशेरे, ता. कऱ्हाड येथील वाळू ठेकेदार पांडुरंग अंतू जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. हणमंत राजाराम जगताप (रा. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड) व सचिन संपत आवटे (रा. कुंडल) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुशेरे येथील पांडुरंग जाधव यांनी वाळूचा ठेका घेतला होता. या व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी वडगाव हवेलीतील हणमंत राजाराम जगताप यांच्याशी संपर्क साधला. हणमंत जगतापच्या मध्यस्थीने पांडुरंग जाधव यांना कुंडल येथील सचिन आवटे याच्याकडून पंधरा लाख रुपये मिळाले. हे पैसे त्यांना दोन हप्त्यात देण्यात आले. त्यानंतर मार्च ते जुलै या महिन्यांत वेगवेगळ्या हप्त्यात पांडुरंग जाधव यांनी २२ लाख रुपये आवटेला परत केले. आॅगस्ट महिन्यातही आणखी रक्कम दिली. व्याजासह त्यांनी एकूण २४ लाख रुपये आवटेला दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, पैसे देऊनही आवटे व जगताप यांच्याकडून पांडुरंग जाधव यांच्याकडे पैशाची मागणी केली जात होती. दोन दिवसांपूर्वी जाधव यांना त्यांनी कऱ्हाडातील एका हॉटेलमध्ये बोलवले. त्याठिकाणी चर्चा केल्यानंतर तीन तास चारचाकी गाडीत नजरकैदेत ठेवत ‘पैसे दिल्याशिवाय सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. जाधव यांनी ‘उद्या पैसे देतो,’ असे सांगितल्यानंतर सोडून दिले. दुसऱ्या दिवशी फोनवरून पैशासाठी धमकी दिल्यानंतर जाधव यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत याबाबतची तक्रार दिली. (प्रतिनिधी)