शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

मलकापुरात ‌‌वाढती गुन्हेगारी; भरदिवसा रस्त्यात तळपली शस्त्रे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 4:02 PM

हल्लेखोरांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावरच नंगानाच करीत शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

माणिक डोंगरे

मलकापूर : शहरात रस्त्यातच भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्यानंतर संबंधित हल्लेखोरांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावरच नंगानाच करीत शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावण आहे. गुन्हेगारी टोळ्यांऐवजी गुंडगिरीत प्यादी सक्रिय झाल्यामुळे शहरात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मलकापूर शहरात किरकोळ कारणांवरून युवकांच्या दोन गटात राडा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांची पोलिसात नोंद होत नाही. परिणामी, सध्या युवकांच्यात कसलीही भीती राहिली नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून वारंवार बाचाबाची व मारामारी होतच असते. गत काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून शहरात पुन्हा एकदा गुंडांची दहशत वाढल्याचे दिसत आहे. बुधवारी अहिल्यानगर येथील विश्वास येडगे हा युवक नेहमीप्रमाणे मलकापूर फाटा परिसरात आला होता. त्यावेळी पाचपेक्षा जास्तजण दुचाकींवरून त्या ठिकाणी आले. काही कळण्यापूर्वीच त्यांनी येडगे यास बेल्टसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.स्वत:ला वाचवण्यासाठी येडगे उपमार्गावर पळत असताना त्यामधील काही युवकांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात उपमार्गावरच पडला. मलकापूर फाटा हे गर्दीचे ठिकाण असल्यामुळे हल्लेखोरांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. मात्र, हातात शस्त्रे घेऊन आरडाओरडा करत भररस्त्याने नंगानाच करीत त्यांनी दहशत माजवली. हल्ल्यानंतर जखमी येडगेला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली असून मलकापुरात सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पहायला मिळत आहे.

भरचौकात झालेल्या हल्ल्याने मलकापूर हादरले

- मलकापूर फाटा हे शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या भरचौकात बुधवारी सकाळी हा हल्ला झाला.- यावेळी परिसरातील काही व्यावसायिकांनी ताबडतोब दुकाने बंद केली.- या घटनेने मलकापूरमधील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. अचानक युवकांच्या टोळक्याने भरचौकात केलेल्या हल्ल्याने मलकापूर हादरले आहे.

वर्चस्ववाद ठरू शकतो टोळीयुद्धाचे कारण

- मलकापुरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पालिकेने आगाशिवनगर येथे झेडपी कॉलनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, शिवाजी चौक, कन्या शाळा परिसर अशा सहा ठिकाणी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे चौकाचौकात होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.- मात्र शहरात युवकांच्या दोन गटात बाचाबाची व हाणामारी होण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे युवकांचे गट एकत्र येत रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळीत तिसरी फळी तयार होत असून हा वर्चस्ववाद टोळीयुद्धाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे अशा घटनांवर आवर घालणे गरजेचे आहे.

बाहेरचे भांडण... मलकापुरात राडा

- अनेक व्यवसाय व नोकरीनिमित्ताने शहरात येणाऱ्याची व जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.- अनेकवेळा परगावात झालेल्या भांडणाचे मलकापुरात उट्टे काढण्याच्या घटना वारंवार घडतात. बाहेर कुठेतरी झालेल्या भांडणातील युवकांचा मलकापुरात राडा होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीKaradकराडPoliceपोलिस