सातारा : कोरोना महामारीत विनाकारण, विनामास्क आणि विनापरवाना पायी फिरणाऱ्या तसेच दुचाकीवर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी काहींच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद चौक, वाय. सी. कॉलेज समोर तसेच सातारा तालुक्यातील कोंडवे येथे झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील जिल्हा परिषद चौकात विनाकारण फिरणाऱ्या सुरज रामदास मोंढे (वय २०, रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा), प्रतीक राजेंद्र वळवी (रा. सदरबझार, सातारा), राजेश तुळशीराम असरकर (वय ३५, रा. अजिंक्य कॉलनी, सदरबझार, सातारा) हे विनाकारण, विनापरवाना दुचाकीवरून फिरत होते. याची तक्रार पोलीस शिपाई सचिन नवघणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे हे करत आहेत. दरम्यान, पोलीस शिपाई चेतन ठेपणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनेश भुरुमल खिवसरा (वय ४५, रा. समर्थनगर, शाहूपुरी, सातारा), योगेश आबाजी जाधव (वय ३२, रा. पुसेसावळी, ता. खटाव,) या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार भिसे हे करत आहेत.
जिल्हा परिषद चौकात आकाश मल्लिकार्जुन अचलेकर (वय १९, रा. मोळाचा ओढा, शाहूपुरी, सातारा) अमीर हमजा रसूल सनदे (वय ७३, रा. विद्यानगर, गोडोली, सातारा), दिनकर कोंडिबा जाधव (वय २०, रा. सैनिक स्कूल शेजारी, सदरबझार, सातारा) विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्यामुळे पोलीस शिपाई चेतन ठेपणे यांनी त्याची तक्रार दिल्यानंतर या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक घाडगे हे करत आहेत.
सातारा येथील वाय. सी. कॉलेज समोर असलेले बर्गर पाॅइंट हे दुकान सुरु ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मयूर राजेंद्र ननावरे (वय २६, रा. मोरे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तक्रार पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे हे करत आहेत.
सातारा तालुक्यातील कोंडवे येथे सार्वजनिक रस्त्यावर भाजी विक्री करत असताना सनी भाऊ साळुंखे (वय ३०, रा. कोंडवे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दीपक पोळ यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक हंकारे हे करत आहेत.