सातारा : कोरेगाव तालुक्यातील सायगाव येथील वृध्दाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राहिमतपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश आबाजी शिंदे (वय ६७, रा. तारगाव, ता. कोरेगाव) हे शनिवार, दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्यासुमारास आपल्या दुचाकीवरुन (एमएच ११ - बीसी ७२८८) रहिमतपूर ते सातारा रस्त्याने भरधाव वेगाने निघाले होते. सायगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या बसस्थानकजवळच्या कमानीजवळ आले असतानाच त्यांच्या दुचाकीची मोहन तुकाराम घोरपडे (वय ६६, रा. सायगाव, ता. कोरेगाव) यांना जोरदार धडक बसली. यात मोहन घोरपडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यातील हवालदार रतन कांबळे यांनी तक्रार दिल्यानंतर सुरेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.