सातारा : कंटेन्मेंट झोन असतानाही ग्रीटची ने आण करणाऱ्या व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नासीर बागवान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्यांनी लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंकज मोहिते यांनी फिर्याद दाखल केली आहे.याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक कुंभार हे बुधवारी रात्री आठ ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना बुधवार नाका येथील कंटेन्मेंट झोन असताना नासीर मेहबूब बागवान (वय ३४, रा. २५१, बुधवार पेठ, सातारा) हे बांधकामासाठी लागणारी ग्रीटची बाहेरुन आत ने आण करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, बांधकाम साहित्य आणणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:20 PM
कंटेन्मेंट झोन असतानाही ग्रीटची ने आण करणाऱ्या व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नासीर बागवान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्यांनी लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंकज मोहिते यांनी फिर्याद दाखल केली आहे.
ठळक मुद्देबांधकाम साहित्य आणणाऱ्यावर गुन्हालॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग