शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्टिरॉइडच्या बेलगाम वापराने म्युकरमायकोसिसचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या आजारात आतापर्यंत कधीही पराभूत न झालेले औषध म्हणून स्टिरॉइडकडे पाहिले जाते. मात्र, त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या आजारात आतापर्यंत कधीही पराभूत न झालेले औषध म्हणून स्टिरॉइडकडे पाहिले जाते. मात्र, त्याचा अनियंत्रित, चुकीच्या मात्रेमध्ये आणि अनिर्बंध काळासाठी वापर झाल्याने म्युकरमायकोसिसचा धोका वाढू लागल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. याबरोबरच रेमडेसिविर, टोसिझूमॅब आणि फॅविपीरावीर यासारखी प्रायोगिक औषधेही यास कारणीभूत असू शकतात, असे समजण्यास वाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

स्टिरॉइडचा वापर कधी केला जावा याचे नियम ठरलेले आहेत. कोविड-१९ आजारात विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीची प्रतिकार शक्ती ज्या पद्धतीने विषाणूशी वागते, त्यानुसार रुग्णाला किती प्रमाणात स्टिरॉइड द्यावं हे ठरतं. सुरुवातीला फुप्फुसाला व नंतर सर्व अवयवांमध्ये कार्यक्षमेतेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. मात्र, आजारात रुग्णांची लक्षणे वाढण्याबरोरब स्टिरॉइडचा वापर पाच ते सात दिवसांसाठी केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के वाढते. स्टिरॉइडच्या वापराने रक्तातील साखरेवर झालेला परिणाम म्हणून ती वाढलेली दिसते, असे मधुमेहतज्ज्ञ सांगतात. त्यांचा सल्ला घेऊन तीन वेळेला तपासणी करून ते प्रमाण २०० च्या खाली ठेवल्यास म्युकरचा त्रास होत नाही. उलट कोविडच्या आजारातून रुग्ण बरे होतील, याची खात्री तज्ज्ञांना आहे.

मधुमेह, कॅन्सर असणाऱ्या ज्या रुग्णांनी कोविडवर मात केली आहे, त्या रुग्णांना पुढे काही महिने धूळ आणि दमट वातावरणात न ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. भरपूर प्रकाश असणारी आणि स्वच्छ खोली हे त्यांचे राहण्याचे ठिकाण असावे, असेही ते सांगतात. म्युकरमायकोसिस हा बरा होणारा आजार आहे, फक्त वेळेवर निदान आणि उपचार ही त्याची महत्त्वाची सूची आहे इतकंच.

चौकट :

१. म्युकरचा फंगस वातावरणातच

म्युकरमायकोसिसमधील फंगस हा खरंतर वातावरणातील ‘युबिकोटस’ म्हणजे सर्व ठिकाणी, सर्व वेळेवर उपस्थित असलेला फंगस आहे. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या फंगसचे आजारात रूपांतर होते. अशा प्रकारच्या केसेस यापूर्वी कर्करोग, एचआयव्ही, अवयव प्रत्यारोपण रुग्ण, अ‍ॅनेमियाच्या रुग्णात पाहायला मिळते. त्यामुळे स्टिरॉइडच्या वापराने म्युकरमायकोसिस वाढले असे म्हणणे अर्धसत्यासारखे आहे.

२. चुकीची उपचार पद्धतीही कारणीभूत

कोविड विषाणूच्या उपचारांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणाऱ्या अनेक रुग्णांना बाह्यरूपाने ऑक्सिजन पुरविला जातो. रुग्णांना लावलेले हे ऑक्सिजन मास्क निर्जंतुक करून घेणे हा वैद्यकीय प्रोटोकॉलचा भाग आहे; पण अनेकदा कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे, तर कधी अचानक दाखल झालेल्या रुग्णांना तातडीने सेवा देण्याच्या गडबडीमुळे हे मास्क निर्जंतुक केले जात नाहीत. अस्वच्छतेमुळेही हा फंगस वाढण्यासाठी वातावरण तयार होते.

कोट :

कोविडच्या आजारात स्टिरॉइडने होणारं नुकसान टाळण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे खापर स्टिारॉइडवर फोडणं चुकीचं आहे. कोणत्याही गोष्टीचा अति वापर धोकादायक असतो. तसाच तो स्टिरॉइडच्या बाबतीतही आहे. बेलगाम आणि अनिर्बंध काळासाठी वापरलेले स्टिरॉइड प्राणघातक ठरतात, याविषयी दुमत नाही; पण म्युकर वैद्यकीय दुर्लक्षाचे द्योतक असू शकतं.

- डॉ. प्रतापराव गोळे, मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा