शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महिलांच्या कुस्त्यांनी रंगले कातरखटावचे मैदान

By admin | Published: February 25, 2015 9:22 PM

जंगी कुस्त्याचे मैदान : शंभर रुपये पासून एक लाखापर्यंतच्या निकाली कुस्त्या

कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथे कात्रेश्वर यात्रेनिमित्त जंगी कुस्त्याचे मैदान पार पडले. महिलांच्या क ुस्त्या पाहण्यासाठी परिसरातून व बाहेरगावाहून पैलवानांनी व कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. या मैदानात शंभर रुपयांपासून एक लाखापर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. महिलांच्या कुस्त्या आहेत म्हटल्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून प्रेक्षकांची गर्दी दिसून येत होती. कुस्त्याची नोंदणी झाल्यानंतर ३ वाजता हालगी व शिंग फुंकून मैदानाला सुरुवात झाली.या मैदानात राज्यातून कोल्हापूर, सांगली, सातारा,अकलूज, इंदापूर, बारामती या ठिकाणाहून पैलवानांनी हजेरी लावली होती. पहिल्यांदाच कातरखटावमध्ये महिलांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत कुस्त्या श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी होत होत्या; पंरतु या वर्षी पहिल्यांदाच यात्राकमेटी व ग्रामस्थांनी यात्राकाळात मैदान भरविण्याचे ठरविले. महिलांमध्ये प्राजक्ता देशमुख, सुप्रिया जाधव, प्रियांका दबडे, तेजस्विनी घाडगे या महिला पैलवानांनी पे्रक्षकांची वाहवा मिळविली. या कुस्त्या ग्रांमस्थाच्या चर्चेचा विषय ठरला. २१ हजार ते १ लाखापर्यंतच्या कुस्त्या बघण्याजोग्या झाल्या. यामध्ये पै. नितीन केचे, पै. संग्राम पोळ, पै. संग्राम पाटील, सोन्या सोनटक्के, पै. पांडुरंग मांडवे, पै. रवी शेंडगे, पै. शिवाजी तांबे, पै. सत्पाल सोनटक्के, पै.सद्दाम शेख यांच्या निकाली कुस्त्या झाल्या. १ लाख इनामाची कुस्ती पै. नितीन केचे व संग्राम पोळ यांच्यात झाली. हे मैदान पाहण्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै.आबा सूळ हे खास करून उपस्थित होते. या मैदानाला पंच म्हणून अर्जुन पाटील, श्रीमंत कोकरे, विकास जाधव, रमेश पवार, बबन बागल, भीमराव पाटोळे यांनी काम पाहिले. कुस्त्यासाठी तानाजीशेठ बागल, शिवाजीशेठ बागल, अ‍ॅड. दिलीप बोडके, संभाजी भिसे, शंकरशेठ बागल यांचे जंगी कुस्त्या भरविण्यासाठी अर्थसाह्य लाभले. कुस्त्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ.आकाराम बोडके, शंकरशेठ बागल, नामदेव बागल, चेअरमन, पोपट बागल, मृगेंद्र शिंदे, अजित सिंहासने, यात्रा कमिटी व सर्व ग्रामंस्थांचे सहकार्य लाभले. पुढील वर्षी यात्रेतील कुस्त्यांमध्ये जास्तीत जास्त पैलवानांनी कुस्त्यासाठी सहभागी व्हावे, असे यात्रा कमिटी तर्फे आवाहान करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)कुस्त्यांच्या फडात महिला पे्रक्षक!महिलांच्या एकूण पाच कुस्त्या झाल्या, या पाचही कुस्त्या निकाली झाल्या. या कुस्त्या पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून येत होती. हे या मैदानाचे या वर्षीचे खास वैशिष्ट्ये ठरले गेले. जस जसा दिवस सूर्यास्ताकडे जात होता तसतसा प्रेक्षकांचा उत्साह वाढत होता.