शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

कोट्यवधींचा भ्रष्टाचार..कारवाईविना ‘सहकार’ !

By admin | Published: July 04, 2016 12:02 AM

कोरेगाव तालुका : देऊर ३ कोटी ४५ लाख, दहिगाव ६७ लाख, न्हावी ९१ लाख, पळशी ६० लाख तर रेवडी ३७ लाखांची अफरातफर

वाठार स्टेशन : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या विविध गावांतील विकास सेवा सोसायट्यांमध्ये मागील ३ वर्षांत तब्बल ६ कोटी ४५ लाखांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. विशेष म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार होऊनही अद्याप कोणावरही ठोस कारवाई झाली नसल्याने सहकार विभागाच्या कारवाईबाबत शंका व्यक्त होत आहे. कोरेगाव तालुक्यातील न्हावी विकास सेवा सोसायटीमध्ये सचिवाने ९१ लाखांची अफरातफर केल्याचा फेरलेखापरीक्षण अहवाल दीड महिन्यापूर्वीच दाखल झाला. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे या सचिवाने अफरातफर झाल्याचे उघड झाल्यानंतर आत्महत्या केल्याने सचिवाकडील असलेली जमीन ताब्यात घेऊन ही वसुली करावी का? त्याच्या वारसाकडून वसुली करावी यावर सध्या सहकार खाते विचार करत आहे. न्हावीनंतर दहिगाव विकास सेवा सोसायटीमध्ये ६७ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे लेखापरीक्षकांनी जाहीर केले. मात्र या अपहारप्रकरणात चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार सहकार विभागाकडून झाला आहे. या अपहारात या सोसायटीच्या सचिवाबरोबरच असलेल्या संचालक मंडळालाच पोलिस ठाण्याची हवा खाण्याची वेळ आली. प्रत्यक्षात या सोसायटीचे फेरलेखापरीक्षण होणे गरजेचे असताना गेल्या दोन वर्षांपासून या सोसायटीचे दफ्तरच कोर्टात असल्याने हे लेखापरीक्षण लांबणीवर पडले आहे. या सोसायटीचे फेरलेखापरीक्षण झाल्यास या सोसायटीतील अफरातफरीच्या आकडेवारीत वाढ होणार आहे. त्यासाठी गेली दोन वर्षांपासून फेरलेखापरीक्षक या दफ्तराच्या प्रतीक्षेत आहेत. दहिगाव सोसायटीमधील अपहार उघड झाला त्यावेळी या सोसायटीचाच सचिव देऊर सोसायटीचे काम पाहत असल्याने या सोसायटीचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यावेळी १ कोटीची अफरातफर असल्याचा अहवाल लेखापरीक्षक साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला. मात्र जिल्हा उपनिबंधकांनी या अहवालावर आक्षेप घेत या सोसायटीचे फेरलेखापरीक्षण करण्याचे निश्चित करत आनंद कणसे यांना नियुक्त केले. कणसे यांनी तब्बल दोन वर्षांच्या काळानंतर या सोसायटीत ३ कोटी ४५ लाखांची अफरातफर झाल्याचा फेरलेखापरीक्षण अहवाल नुकताच जिल्हा उपनिबंधकांकडे दिला आहे. याबाबत आता लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन तालुका उपनिबंधकांनी दिले आहे. या सोसायटीतील अपहारात तब्बल ६५ जणांवर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न आहे. या सर्व प्रक्रियेत लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनी या संस्थेचे दरवर्षी लेखापरीक्षण करून नेमकं काय तपासलं असाच प्रश्न अनेकांना पडतो. जर या लेखापरीक्षकांनी ही बाब वेळच्या वेळी संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिली असती तर यातील अनेक सोसायट्या वाचल्या असत्या. त्यामुळे या भ्रष्टाचार प्रकरणात ज्या लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण केले त्यांनाही सहकार खात्याकडून योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आहे. (वार्ताहर) सहकार चळवळ वाचविण्याची गरज ४देऊरपाठोपाठ पळशी व रेवडी या दोन्ही सोसायट्यांमध्ये ९१ लाखांचा अपहार झाला. याबाबतही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. तालुक्याच्या सहकार क्षेत्रात ग्रामीण भागाला अर्थपुरवठा करणाऱ्या विकास सेवा सोसायट्यांचे भवितव्यच खरचं अंधारमय झाले आहे का? आज जवळपास ६ कोटी ४५ लाखांची अफरातफर होऊनही सर्व काही अलबेल असेच वातावरण सर्वत्र आहे. या सोसायट्यांवर सहकारखात्याचा खरच धाक राहिला नाही का? असाच प्रश्न या कारभाराकडे पाहिल्यावर सर्व सामान्यांना पडतो. ४कोरेगाव तालुक्यातील सहकारी सेवा सोसायट्यांच्या भ्रष्टाचाराला आळा घालून ग्रामीण भागातील ही सहकार चळवळ मोडीत जाण्यापासून वाचवण्याचीच आज गरज आहे. तालुक्यात अशा अनेक आदर्श काम करणाऱ्या सेवा सोसायट्या आहेत. त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची अर्थवाहिनी जिवंत राहिली पाहिजे, यासाठी जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधकांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे. कोरेगाव तालुक्यातील देऊर व न्हावी सोसायटीचे दोन्ही अहवाल कोरेगाव व सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयास उपलब्ध झाले आहेत. यामधील विशेष लेखापरीक्षण अहवालाबाबत कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चित करण्याच्या कामाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार आहे. तसेच दहिगाव सोसायटीचे दफ्तर हे न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे ते लवकरच फेरतपासणीसाठी लेखापरीक्षकास देण्यात येणार आहे. वरील सर्व सोसायट्यांबाबत आमचे कामकाज चालू आहे. कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घेतले जातील. - युसुफ शेख, सहायक निबंधक कोरेगाव