लोणंद : येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी
मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
लोणंद येथील लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी
गोविंद मित्रांच्या सहकार्याने लसीकरण सुलभ होण्यास मदत होत असली तरी नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाही. मंगळवार, दि. २७ रोजी १८० नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व पटल्याने नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करीत आहेत. त्यात दररोज मर्यादित डोस उपलब्ध होत असल्याने या केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागत आहेत.
लोणंद व परिसरातील नागरिकांचे लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सुवर्णगाथा प्रतिष्ठानच्यावतीने भव्य मंडप टाकण्यात आला आहे. दररोज दहा ते पंधरा कोविन मित्र नागरिकांच्या लसीकरणाच्या राजिस्ट्रेशनपासून ते त्यांना लस मिळेपर्यंत आरोग्य विभागास सहकार्य करीत आहेत.
या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
तहासीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी मंगळवारी लसीकरण केंद्रावर भेट देऊन कोविन मित्रांचे कौतुक केले. नागरिकांनी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सचे पालन करीत लसीकरण करून लसीकरण करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये व कोरोनाची साखळी खंडित करण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे अवाहन तहसीलदार काळे यांनी केले आहे.