शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘चंदर’च्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून गर्दी

By admin | Published: February 20, 2015 9:03 PM

आवारवाडीवर शोककळा : नऊ स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवणारा बैल हरपला

पुसेगाव : आवारवाडी (विसापूर), ता. खटाव येथील अनिल काळू बुधावले यांचा बैलगाडी शर्यतीत महाराष्ट्र चॅम्पियन असणाऱ्या चंदर बैलाचे आजाराने निधन झाले. निधनाची बातमी समजताच महाराष्ट्रातून बैलगाडी शौकिनांनी थेट आवारवाडी गाठत त्याला श्रद्धाजंली वाहिली. त्याच्या निधनाने बैलगाडी शौकिनांमध्ये शोककळा पसरली आहे.मुंबई येथील एका शेठकडून शेतकरी अनिल बुधावले यांनी आठ महिन्यांपूर्वी बैलगाडी शर्यतीत नामांकित असणारा चंदर (मळा) हा बैल आठ लाख एक हजार रुपयांना विकत घेतला होता. बैल विकत घेण्यापूर्वी त्याने सुमारे १०५ फायनल घेतली होती. अनिल बुधावले यांच्याकडे आल्यानंतर चंदर बैलाने नामांकित बैलगाडी शर्यतीत नऊ ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवून आपला व मालकाचा नावलौकिक वाढविला होता.खेडशिवापूर येथील बैलगाडी शैर्यतीत तर प्रथम क्रमांकाची दीड किलो वजनाची चांदीची गदा तसेच भिवरी, ता. भोर येथे ही प्रथम क्रमांक मिळवून दुचाकी त्याने जिंकली होती. याशिवाय बैलगाडी शर्यतीमध्ये नामांकित असणाऱ्या पुसेगाव, कोरेगाव, इस्लामपूर, कोळे यासह विविध ठिकाणची मैदाने त्याने सहजपणे मारली होती. चंदर (मळा) बैलगाडी शर्यतीच्या मैदानात येणार म्हटले की, बैलगाडी शौकीन एकाग्र होऊन त्याचा पळ पाहत होते. त्याचा पळ पाहिल्यानंतर बैलगाडी शर्यत शौकिनांचे डोळ्याचे पारणे फिटायचे.अनिल बुधावले या शेतकऱ्यांने पारंपरिक छंद जोपासण्यासाठी आठ लाख रुपये खर्च करून चंदर विकत घेतला होता. मात्र, काही दिवसानंतर लगेचच बैलगाडी शर्यतीवर बंदी आली. त्यातच चंदरचे निधन झाल्याने अनिल बुधावले यांचे बैलगाडी शर्यतीचे स्वप्न अपुरे राहिले.चंदर बैलाची निधनाची बातमी समजताच बैलगाडी शौकिनांनी थेट आवारवाडी गाठत त्याला श्रद्धाजंली वाहिली. आपल्या लाडक्या चंदरला अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. (वार्ताहर)