लोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : शहराच्या पश्चिमेस असलेल्या कास तलावातील पाणीपातळीत कमालीची घट झाल्याने तलावाला बेटाचे स्वरूप आले होते. तलावात बेटाच्या चहूबाजूने जमीन उघडी पडल्याने कास तलावावर जणू काही स्वीमिंग टँक साकारल्याचे चित्र दिसून येत आहे.सातारा शहराला सुरू असलेला रोजचा पाणीपुरवठा तसेच कडक उन्हाची तीव्रता पाहता कास तलावातील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालल्याने पात्रातील जमीन उघडी पडत चालली आहे. गेल्या काही दिवसांत तलावावर जणू बेटाचं चित्र साकारलेले होते. परंतु आत्ता तर चहूबाजूने जमीन उघडी पडल्याने पर्यटक आपापली वाहने बेटावर पार्क करताना दिसत आहेत.तसेच तलावात एखाद्या स्वीमिंग टँकची रचना झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कित्येक पर्यटक या स्वीमिंग टँकमध्ये जलविहाराचा आनंद लुटत आहेत. तसेच या मनमोहक दृश्याचा मोह पर्यटकांना आवरत नसल्याने पर्यटक अगदी पाण्याच्या टोकावर आपापली वाहने घेऊन जात आहेत. पोहण्याचा आनंदतलावात स्वीमिंग टँक साकारल्याने कित्येक पर्यटक तलावात पोहण्याचा आनंद घेण्यापेक्षा या टँककडे जास्त आकर्षिलेले दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा टँक आकर्षित करून घेत आहे.
कास तलावावर पर्यटकांची गर्दी
By admin | Published: May 11, 2017 11:05 PM