मार्च महिना अखेरपर्यंत आर्थिक कामे उरकण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. तसेच सुट्टीदिवशीही कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. त्यातच बिले काढण्यासाठी बांधकामसह इतर विभागात गर्दी होताना दिसून येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामे करताना अडचणी येत आहेत.
...........................................
ग्रामीण भागात कोरोना वाढू लागला
सातारा : जिल्ह्यातील शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. यामुळे अनेक गावांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. आता तर कोरोना कहर सुरू आहे. दररोज २००, ३०० च्य्या पटीत रुग्ण वाढत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे गावा-गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक गावांनी उपाययोजना सुरू केली आहे.
.........................................................