सातारा : जिल्ह्यामध्ये सात दिवसांचे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याने बँकांमधील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी बँकांच्या बाहेर मोठाल्या रांगा लागत होत्या आणि सिक्युरिटी गार्डला वारंवार ही गर्दी रोखण्यासाठी, तसेच सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी सूचना कराव्या लागत होत्या.
सातारा शहरातील सहकारी, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या बाहेर आता गर्दी पाहायला मिळत नाही. मात्र, बँकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्याचे समोर येते. शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार केला गेला आणि ठिकाणी काउंटरवर प्लास्टिकची आवरणे लावण्यात आली असून, ग्राहकांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. बँकेमध्ये सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगसाठी चौकोन अशी उपाययोजना केलेली पाहायला मिळते.
बँकांमध्ये ५० टक्के कर्मचारी वर्ग हा बँकेत येऊन काम करतो. उर्वरित कर्मचारी बँकेत येत नाहीत, काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलेले आहे. सात दिवसांचा लॉकडाऊन असल्याने बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळत नसली तरीदेखील सात दिवसांनंतर जर हा लॉकडाऊन काढण्यात आला, तर बँकांमध्ये पुन्हा अशी गर्दी होऊ शकते, हे लक्षात घेऊन बँक अधिकाऱ्यांनी तीन ग्राहकांवर कोणालाही बँकेत प्रवेश न देण्याची उपाययोजना केली आहे.
१) दीड-दीड कॉलमचे दोन फोटो आणि त्याखाली प्रत्येकी चार ओळींची बॉक्स.
बँक ऑफ इंडिया
सातारा शहरातील बँक ऑफ इंडियाच्या गुरुवार पेठ शाखेमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून बँक अधिकाऱ्यांच्या काउंटर पुढे प्लास्टिक आवरण लावण्यात आलेले आहे. त्यातच खिडक्या काढण्यात आलेल्या आहेत. सुरक्षिततेची उपाययोजना चांगली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
सातारा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतापगंज पेठ शाखेमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन केल्यानंतर गर्दी ओसरलेली पाहायला मिळते. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी लोकांची प्रचंड गर्दी होत होती. बँकेच्या सिक्युरिटी अधिकाऱ्याला या ठिकाणी सूचना द्याव्या लागत होत्या.
बँक अधिकाऱ्याचा कोट
बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये जे ग्राहक येतात त्यांना मास्क असेल तरच प्रवेश दिला जातो, तसेच शाखेच्या बाहेर रांग लावण्यात येते. त्यातखील सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी बॉक्स तयार करण्यात आले आहेत.
- अस्मिता बनसोडे, सहायक अधिकारी
आमच्या बँकेत येणाऱ्या ग्राहकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. बँकेमध्ये सॅनिटायझरची सुविधा करण्यात आली आहे. ५० टक्के स्टाफवर काम सुरू असून, कर्मचाऱ्यांना हँडग्लोज देण्यात आले आहेत. बँकेत मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
- अन्वर सय्यद, बँक अधिकारी
ग्राहकांच्या प्रतिक्रिया
कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी बँकांमध्ये जे सूचनाफलक दिलेले आहेत, त्याचे तंतोतंत पालन आम्ही करतोय. थोडा वेळ लागत असला तरी चालेल मात्र, लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- संदीप बाबर
जिल्ह्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन केले गेले असल्याने आता बँकांमध्येदेखील गर्दी नसते. दवाखान्यामध्ये पैसे लागणार होते, यासाठी बँकेत आलो होतो. गर्दी कमी झाल्याने माझे कामदेखील लवकर झाले.
- तुषार पवार
ज्या बँकेमध्ये पुस्तक भरून देण्यासाठी मशीनची सुविधा आहे. त्या बँकांनी पासबुकवर सरसकट बारकोड द्यावा, म्हणजे जे ग्राहक आहेत, त्यांना बँकेत आल्यानंतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येण्याची गरज पडणार नाही.
- महेश पाटील
दोन फोटो आहेत