शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सांस्कृतिक वाईचा कृष्णाकाठ ढोल-ताशांनी दणाणला!

By admin | Published: December 03, 2015 9:56 PM

‘लोकमत इनिशिएटिव्ह’चे यश : डॉल्बीला फाटा दिल्याने ज्येष्ठांचाही वाढला सहभाग

वाई : पद्मश्री शाहीर साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठा सेवा संस्थेने महागणपती घाटावर ढोल-ताशाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेला गणेशोत्सव मंडळांनी तसेच ढोल-ताशा मंडळांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला़ स्पर्धेमध्ये वैयक्तिक गट व सांघिक गटात प्रेक्षकांना वेगवेगळी कसब पाहावयास मिळाल्याने वाईकर रसिक मत्रमुंग्ध झाले़ आणि महागणपती घाटावर एक वेगळे चैतन्याचा महापूर आला़ यावेळी तीन हजारांच्या वर वाईकर नागरिक घाटावर उपस्थित होते़ डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम समोर आल्याने प्रशासनाने कंबर कसली़ राज्य शासनानेही डॉल्बीवर अटी-शर्ती लावून बंदी घातली. गेली वर्षभर ‘लोकमत’ने ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉल्बीच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती केली़ याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी, गावांनी स्वत:हून डॉल्बी न वाजविण्याचा निर्णय घेतला़ अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांची कास धरली, अनेक मंडळे ढोल-ताशाकडे वळाली. गणेशोत्सवात चौकाचौकांतून ढोल-ताशा वाजू लागले़ या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संस्थेने पहिल्यांदा एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आणि याला वाईकर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला़ स्पर्धेमध्ये सहभागी मंडळात मुलींचा सहभाग ही लक्षणीय होता़ शाहीर साबळे यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे उ्घाटन ‘इंटेक’च्या अध्यक्षा वनिता जाधव यांच्या हस्ते झाले़ परीक्षक म्हणून गणेश इंगवले व सनी करंबे यांनी काम पाहिले़ यावेळी बी. जी. शिर्के कंपनीचे सीईओ जगन्नाथ जाधव, नगरसेवक अनिल सावंत, भारत खामकर, मदन पोरे, काशिनाथ शेलार, डॉ़ नितीन कदम, संजय चौधरी, हेंमत येवले, अ‍ॅड़ प्रतापराव शिंदे, अ‍ॅड. जगदीश पाटणे, प्रदीप जायगुडे, अमित गुडगे-पाटील, राजेश पाडळे, हृषीकेश बाबर, बाजीराव मोरे, सुनील शिंदे, जयदीप शिंदे, आबा चोरगे, नाना खोपडे, सजंय शेटे, विजय ढेकाणे, धंनजंय शिंदे, इंटेकच्या प्रतिभा मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती़ स्पर्धेमध्ये वैयक्तिक सादरीकरणात प्रथम क्रंमाक नितीन शिंदे -शिवप्रतिज्ञा ढोल पथक रविवारपेठ, वाई, द्वितीय दुर्गेश सोनावणे - सिंहगर्जना ढोल पथक, ब्राह्मणशाही वाई़ सामूहिक स्पर्धेत प्रथम क्रमांक धर्मपुरी युवा ढोल-ताशा मंडळ, यांना ११,००० व ट्रॉफी, द्वितीय क्षत्रीय कुलावंतस ढोल पथक ब्राह्मणशाही, वाई यांना ७,००० व ट्रॉफी, तृतीय क्रमांक आझाद झांज पथक, सोनगिरवाडी वाई यांना ५,००० व ट्रॉफी, व उत्तेजनार्थ सिंहगर्जना ब्राह्मणशाही वाई व स्वाभिमानी मराठा ढोल-ताशा पथक नावेचीवाडी वाई यांनी पटकाविला़ विजेत्या स्पर्धकांना शाहीर साबळे यांच्या पत्नी माई साबळे व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी, रोख रकमेचा चेक व शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली़ लक्ष्मीकांत रांजणे यांनी सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)चोखळल्या ढोल-ताशाच्या वाटा डॉल्बीमुळे ध्वनिप्रदूषण होते़ शहरात शाळा व हॉस्पिटलच्या परिसरात रुग्ण व विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वाहत जाते़ सामान्य नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतो, यामुळे डॉल्बीविषयी असलेल्या लोकभावनेचा व आलेल्या बंदीचा विचार करून अनेक मंडळांनी सकारात्मक पाऊल उचलून डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांची कास धरली आहे़