शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Maratha Reservation: आरक्षण दिल्याशिवाय पेपर नाही, साताऱ्यातील दहिवडीत विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

By दीपक शिंदे | Published: October 31, 2023 1:53 PM

तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा घेतला निर्णय

दहिवडी : दहिवडी (ता. माण) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. ३१) परीक्षेवर बहिष्कार टाकत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही, असा निर्णय घेतला.मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा भरेल, असे वाटत असतानाच अचानक सर्व मुले महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमली. क्षणभर काही कळायच्या आतच घोषणा सुरू झाल्या. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण नाही तोपर्यंत शाळा नाय, असा पवित्रा घेतला. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचाही नाईलाज झाला. प्रवेशद्वाराजवळ शेकडो विद्यार्थी जमा झाले तसेच जरांगे-पाटील यांना पाठिंबा म्हणून आंदोलन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना आरक्षण नसेल तर शिकून तरी काय करायचे, आम्हाला सवलत नसल्याने, आमची ऐपत नसल्याने, उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्यापेक्षा सरकारने आरक्षण द्यावे. दिले नाही तर पेपर पण नाही, शाळा पण नको, या भूमिकेशी आम्ही ठाम राहणार, असे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षा