शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

दरवाढीने स्वयंपाकघरात ‘डाळ शिजेना’!

By admin | Published: October 25, 2015 12:06 AM

महागाईने वाजविले तीनतेरा : तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; इतर कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात वापर; तूरडाळीच्या पदार्थांचीही दरवाढ

सातारा : ऐन सणांच्या तोंडावर महिन्यापूर्वी ऐंशी रुपये किलो मिळणाऱ्या तूरडाळीचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या तूरडाळ २२० रूपये किलोवर जाऊन पोहोचली आहे. डाळ दराच्या तडक्याने गृहिणींसह सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. दिवाळीच्या तोंडावर तूरडाळीचे भाव उतरतील, असे सरकार म्हणत असले तरी आयात केलेली डाळ ग्राहकांना १४० ते १५० रूपये किलो दरानेच मिळणार आहे. हा दरही सर्वसामान्यांना न परवडणारा असून यामुळे दर उतरल्याशिवाय स्वयंपाकघरात ‘डाळ काही शिजणार नाही’, असेच चित्र दिसत आहे. तूरडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ हरभऱ्याची डाळ, मूगडाळ या डाळी सर्वसामान्यांचे जेवणात दररोज दिसतात. पावसाअभावी भाजीपाल्याचे दर तेजीत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात जेवणासाठी डाळींचाच जास्त प्रमाणात वापर केला जातो. अगदी पालेभाजी, फळभाजी करतानाही त्यामध्ये डाळ वापरली जाते. असे एकही घर शोधून सापडणार नाही, जिथे डाळ खाल्ली जात नसेल. एवढं सख्ख्य माणसाचं आणि डाळीचं जमलं आहे. हॉटेल, खाणावळीत डाळींचा जास्त वापर होतो. ‘डाळ तडका’, ‘अख्खा मसूर’ ही डिश तर सर्वांचीच आवडती असते. मात्र दरवाढीमुळे सर्वत्रच डाळ वापराचे प्रमाण कमी झाले आहे. एकूणच माणसाच्या आयुष्यात डाळीचं असणारं महत्त्व आणि डाळीचे वाढते दर याविषयी ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत बहुतांशी कुटुंबातील स्वयंपाकघरातून तूरडाळ जवळजवळ दुरावली असून ती वापराचे प्रमाण २५ टक्के आहे. तर हॉटेल व्यावसायिकांनी डाळीच्या पदार्थांच्या किमती वाढविल्या असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)  

महागाईत जनता भरडली भरमसाठ दरामुळे भाजीपाला खाण्याची तर काही सोय राहिली नाही आणि रोज भाजी विकत घेणंही खिशाला परवडत नाही. त्यापेक्षा किलोभर डाळ घेतली की महिनाभराचं काम भागत होतं. पण आता डाळीचेही भाव वधारले आहेत. आता डाळपाण्यावर दिवस काढण्याचे दिवसही आता राहिले नाहीत. - दिनकर देगावकर, नागरिक, सातारा  

मागील दोन महिन्यांपासून तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे डाळीऐवजी कडधान्याचा पर्याय निवडला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकही तूरडाळीची भूक मूग, मसूर, घेवडा या डाळींवरच भागवितात. दर कमी झाल्याशिवाय तूरडाळ मुखात पडणार नाही. किलोभर लागणारी डाळ आता पावशेरच्या घरात आली आहे. - अनुश्री रजपूत, गृहिणी  

हॉटेल, खाणावळीत वांगी, बटाटा यासोबत डाळही लागते. मात्र आता डाळ महागल्यामुळे ‘डाळ तडका’ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे आता मिक्स वाटाणा भाजीच जास्त चालते. - मोहनसिंग रजपूत, हॉटेलचालक