शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

सातारा जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; नेमका पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: May 30, 2024 6:59 PM

दुष्काळामुळे सिंचनासाठी मागणी वाढली

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता असून, सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत असल्याने धरणे रिकामी होऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला आहे. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ टक्के साठा राहिला आहे. कोयना धरणात १९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. सध्या सर्वांचेच डोळे मान्सूनकडे आहेत.जिल्ह्यातील शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पर्जन्यमान होते. यावरच जिल्ह्यातील कृषिक्षेत्राची मदार असते. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यातच अपुरा पाऊस झाला. सुमारे ३० टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे सर्वच तालुक्यांत कमी - अधिक फरकाने परिणाम झाला. त्यातच जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा पोहोचलेला. तशीच स्थिती कण्हेर आणि उरमोडी या धरणाची होती. जिल्ह्यातील या धरणांचेच पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जाते. त्यामुळे ही धरणे कृषिक्षेत्राला आधार देणारी ठरतात. पण, गेल्यावर्षी धरणेच न भरल्याने सिंचनासाठी सतत मागणी वाढत गेली. परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून मागणीप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. यासाठी पाण्याची तरतूद आहे. तसेच धरणातील पाण्यावर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन पाणी योजना आहेत. या धरणातील पाणी अधिक करून सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनेसाठीही कोयनेचे पाणी सोडण्यात येते. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या २१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता १८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. १९.१९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.उरमोडी धरणावर सातारा आणि माण, खटाव हे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत. गेल्यावर्षी उरमोडी धरण भरले नव्हते. पण, सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. आज धरणात अवघा ७.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणात पाऊण टीएमसी पाणी आहे. तशीच स्थिती कण्हेर धरणाची आहे. या धरणात १.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण १७.२२ आहे, तर कण्हेरमधूनही सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्यात धोम धरण असून, यामध्ये ४.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती (टीएमसीमध्ये)धरण  - सध्याचा साठा  -  टक्केवारी  - एकूण पाणीसाठाकोयना -   १९.१९  -  १८.२२ -  १०५.२५धोम  -  ४.७४  -  ३५.१३  -  १३.५०बलकवडी -  ०.१३ -  ३.१४  -  ४.०८कण्हेर - १.७४ -  १७.२२ -  १०.१०उरमोडी -  ०.७५ -  ७.५७ -  ९.९६तारळी  -  १.४८ - २५.३२ -  ५.८५

मागील वर्षी कण्हेर, तारळी अन् उरमोडीत अधिक साठा शिल्लक

जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणी सिंचनासाठी सोडण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यानंतर या धरणातील पाणी तरतुदीनुसार सोडले जाते. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे धरणे रिकामी होऊ लागली आहेत. गतवर्षी काही धरणांत जादा पाणीसाठा होता. गेल्यावर्षी ३० मेपर्यंत कण्हेरमध्ये २.४१ टीएमसी पाणी होते,, तर उरमोडीत ४.१५ आणि तारळी ३.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. कारण, २०२२ मध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील पाण्याला मागणी कमी होती. त्याचबरोबर कोयना धरणात गेल्यावर्षी १९.७२ टीएमसी साठा होता.  सध्या धरणात १९.१९ टीएमसी पाणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी