कºहाडसह पाटण तालुक्यात रायवळ आंबा मोठ्या प्रमाणात मिळतो. चवीने आंबट असल्यामुळे यातील बहुतांशी आंबे हे लोणचे बनवणाºया कंपन्यांना कैरीच्या स्वरूपात पाठवले जातात. पूर्वी प्रत्येक घरात लोणचे बनवून ठेवण्यात येत होते; पण कालांतराने रेडीमेडच्या जमान्यात घरातील लोणच्याच्या बरण्या हद्दपार झाल्या. तर काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच घरात लोणचे बनवले जाते. सुधारित व मधुर रसाच्या आंब्यांच्या जाती वाढल्यामुळे लोकांचीही त्याला मागणी वाढली. त्यामुळे शेती पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकºयांनी हापूस, रत्नागिरी, देवगड, सिंधू, तोतापुरी यासह अनेक वेगळ्या झाडांची लागवड करत चार पैसे मिळवायला सुरुवात केली; पण कोकणासारखे या विभागात पोषक वातावरण नसल्याने अंबा पिकायला उशीर होत आहे. तसेच हातातोंडाशी आलेल्या पिकावर वळीव पावसाबरोबरच गारपीट होत आहे. वादळी वाºयाने आंबे जमिनीवर पडून नुकसान होत आहे.
वळीव पावसाने आंब्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:39 AM