सातारा : उन्हाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनू लागली आहे. त्यातच प्रमुख धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने खालावू लागला आहे. कोयना धरणात केवळ ३१.०६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांनी देखील तळ गाठला आहे.जिल्ह्यात लहान-मोठी जवळपास पंधरा धरणे आहेत. यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात आजमितीस ३१.०६ टीमएसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून ३ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यापैकी पायथा वीजगृहासाठी २ हजार १०० तर नदी विमोचकातून १ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंधरा जूनपर्यंत पाऊस न आल्यास विजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे नियोजन करणे हे एकप्रकारे धरण व्यवस्थापनापुढे आव्हान ठरणार आहे.कोयनेसह धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर व तारळी या धरणांमधील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात खालावला आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे धरणे तळ गाठू लागल्याने माण, खटाव, कोरेगाव व फलटण या तालुक्यांचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. पाण्यासाठी पायपीट करणाºया दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने पाणी टॅँकर सुरू करण्यात आले आहे. मान्सून सुरू होण्यासाठी अजूनही एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे. मान्सून वेळेवर आला नाही तर जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या अधिकच भीषण होऊ शकते. त्यामुळे वेळीच उपाययोजनेची गरज आहे.२२३ टॅँकर भागवतायत तहानजिल्ह्यातील १८६ गावे व ७७६ वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थ व जनावरांची तहान टॅँकरद्वारे भागविली जात आहे. सध्या माण तालुक्यात १०७, खटाव ३९, कोरेगाव ३१, खंडाळा २, फलटण २५, वाई ६, पाटण २, जावळी ४, महाबळेश्वर ३, सातारा २ तर कºहाड तालुक्यात २ असे एकूण २२३ पाणी टॅँकर प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत.१११ विहिरींचे अधिग्रहणग्रामस्थांचा पाणीप्रश्न मिटावा, यासाठी प्रशानाच्या वतीने जिल्ह्यातील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यातील ३१, खटाव ३६, कोरेगाव ७, खंडाळा २, फलटण ८, वाई १८, पाटण १, जावळी ३, महाबळेश्वर ५ अशा एकूण १११ विहिरींचा समावेश आहे.प्रमुख धरणांचा साठा (टीएमसीमध्ये)क्षमता शिल्लक साठाकोयना धरण १०५.२५ ३१.६धोम १३.५० १.३०बलकवडी ४.०८ ०.४३कण्हेर १०.१० २.६०उरमोडी ९.८० १.५२तारळी ५.८५ २.०
धरणांनी गाठला तळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:02 PM