शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

दोन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी

By admin | Published: July 10, 2017 11:18 PM

दोन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी

लोकमत न्यूजनेटवर्कसातारा : नवरा व नणंद करत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. यातून दोन्ही मुली बचावल्या तर आईचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. संगीता विजय मोरे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पूनम (वय १३) तर पायल (८) असे बचावलेल्या मुलींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता हिचा भाऊ प्रशांत तानाजी ननावरे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगीता ही नवरा विजय बाबूराव मोरे (सध्या रा. जकातवाडी, मूळ. रा. तिळवणे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व दोन मुलींसह राहत होती. पती विजयचे कोणत्या तरी महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय संगीताला येत होता. त्यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. नवरा विजय व नणंद प्रियंका संगीताला वर्षापासून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत होते. मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संगीताने सोमवारी सकाळी दोन्ही मुलींसह विहिरीत उडी घेतली. त्यातून दोन्ही मुली बचावल्या असून, संगीताचा मात्र मृत्यू झाला. याप्रकरणी नवरा विजय व नणंद प्रियंका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. ए. पाटील तपास करीत आहेत.कठड्याला धरल्याने दोघी वाचल्यासंगीताने सर्वप्रथम लहान मुलगी पायल हिला विहिरीत फेकले. त्यानंतर मोठी पूनमला धरून स्वत: विहिरीत उडी घेतली. मात्र, घाबरलेल्या पूनमने कठड्याला धरल्याने ती वरच राहिली अन् आई आत पडली. पूनमने आरडाओरड केल्यानंतर आलेल्या ग्रामस्थांनी पायलला बाहेर काढले. तोपर्यंत आईचा मृत्यू झाला. मुलीकडूनच लिहून घेतली चिठ्ठीविजय हा रविवारीच घरातून दागिने घेऊन गायब झाला होता. संगीताने सोमवारी पहाटे मोठी मुलगी पूनमकडून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून घरात ठेवली होती. त्यात नवऱ्याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.