आॅनलान लोकमत सातारा,दि. ११ : साताऱ्यातील स्पष्ट दिसणारी माळिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळोशी या गावावरील कड्याचे संकट अद्यापही दुर झालेले दिसत नाही. नुकतेच केलेल्या अभ्यासानुसार हा कडा गावातील ७०० लोकांच्या जिवावर कधीही उठू शकतो अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. परळी खोऱ्यातील काळोशी या गावातील कड्याचा सविस्तर अभ्यास दूर संवेदन, जीपीएस आणि ड्रोनच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी कॉलेजने केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या या सर्व्हेक्षण अहवाल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना सादर करण्यात आला आहे.काळोशी गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. डोंगराचा कडा निसटल्यामुळे या गावावर मोठे संकट ओढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याविषयी ह्यलोकमतह्णने वारंवार प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी कॉलेजमधील डॉ. सुभाष कारंडे, प्रा. हनुमंत सानप व शैलेश चव्हाण यांनी काळोशीचा सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. यात काळोशी ग्रामस्थांच्या जिवीताला धोका असल्याचे म्हटले आहे
काळोशीच्या कड्याचा धोका कायम
By admin | Published: July 11, 2017 3:44 PM