शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

धोकादायक थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:39 AM

शिरवळ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने ...

शिरवळ : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत, असे संकेत आहेत. तरीही खासगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे महामार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ते कोठे तरी थांबविण्याची गरज आहे.

००००००

पाणपोईची गरज

वडूज : खटाव तालुक्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिकांना सतत तहान लागत आहे. विविध शासकीय कामांनिमित्ताने ग्रामस्थ ग्रामीण भागातून वडूजला येत असतात. त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन सातारा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

०००००००

राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत यश

सातारा : राष्ट्रीय सिनिअर पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत श्री शिवाजी उदय मंडळाचा खेळाडू व चाफळ येथील सुशांत रमेश पाटील याने दुसरा क्रमांक मिळवून रजत पदक संपादन केले. झारखंड येथील टाटानगर येथे या स्पर्धा पार पडल्या. ८३ किलो वजन गटात सुशांतने हे यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल कौतुक केले जात आहे.

००००००

बसस्थानक ओस

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर उन्हाचा कडाकाही वाढत आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकांत दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत आहे. त्याचा परिणाम एसटीच्या फेऱ्यांवरही होत असल्याचे जाणवत आहे.

०००००००००

पाण्याची सोय करावी

सातारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांच्या समोर असलेल्या मैदानात कोरोनापूर्वी शोभेची झाडे, फुलझाडे लावली होती. त्यांची सेवकाकडून निगा राखली जात होती. मुलं, शिक्षक पाणी घालत असत. कोरोनामुळे ते बंद झाले आहे. त्यामुळे झाडेही कोमेजू लागली आहेत. पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

००००००

रात्रीच्या संचारबंदीतही रस्ते गजबजलेले

सातारा : कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक प्रकारे नियोजन करीत आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये रात्री आठनंतर कोणीही बाहेर पडणे गरजेचे नाही. त्यातून अत्यावश्यक सेवेला सवलत दिली आहे. मात्र रात्री ११ वाजले तरी असंख्य सातारकर दुचाकीवरून फेरी मारत असतात.

०००००

शहरात पोस्टमन त्रस्त

सातारा : साताऱ्यात अनेक बहुमजली इमारती आहेत. त्या ठिकाणी टपालपेट्यांची नितांत गरज आहे. पोस्टमनला प्रत्येक पत्रासाठी चौथ्या मजल्यावर जावे लागते. ही बाब अवघड जात असल्याने पार्किंगमध्ये टपालपेट्या बसवाव्यात, अशी मागणी पोस्टमनकरून केली जाते. मात्र ती पूर्ण होत नसल्याने पोस्टमन त्रस्त झाले आहेत.

००००००

नळाच्या तोट्या गायब

सातारा : मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून पाणीसाठा आटत आहे. भविष्यात काही भागात पाण्याची टंचाई भासू शकते. मात्र तरीही शहरातून अजूनही खबरदारी घेतली जात नाही. अनेक ठिकाणी नळाच्या तोट्या गायब झाल्या असून पाण्याचा अपव्यय होतो आहे.

०००००००

बक्षिसासह फिरत्या चषकाचे वितरण

सातारा : साताऱ्यातील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. निळकंठ शिंदे यांनी महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी व क्रीडा विभागातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक विद्यार्थी, विद्यार्थिनीला बक्षीस व फिरता चषक देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्याचे वितरण करण्यात आले. या वेळी अर्थशास्त्र विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास चषक वितरित करण्यात आला.

(फोटो स्कॅन करायला दिला आहे.)

०००००००

जिल्हा सीमा खुल्याच

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढत असतानाही जिल्ह्याच्या सीमेवर कसल्याही प्रकारे तपासणी केली जात नाही. पुण्याहून अधिक प्रमाणात सातारकर येत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

००००००

यात्रा साध्या पद्धतीने

सातारा : जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांना प्रारंभ झाला आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने साध्या पद्धतीने यात्रा साजऱ्या केल्या जात आहेत. घरच्या घरी कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यामुळे यात्रेनिमित्ताने पै-पाहुणे, मित्रांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या जेवणावळ्या बंद झाल्या आहेत.