शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

राष्ट्रवादीच्या विरोधकांचा डांगोराच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:45 PM

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ठाम विरोधक ठरणाऱ्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ठाम विरोधक ठरणाऱ्या युतीतील शिवसेना आणि भाजपचे नेते मतदारसंघ आमच्याकडेच राहणार म्हणून सांगत असल्यानेच उमेदवारीचा निर्णय लांबणीवर पडत आहे. त्यातच आधी मतदारसंघ कोणाकडे जाईल, यावर बैठक होणार असून, त्यानंतरच युतीतील संबंधित पक्ष उमेदवाराचे नाव जाहीर करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामुळे मतदारसंघ आमच्याकडेच राहणार म्हणण्याचा दावा कोणासाठी खरा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सातारा मतदारसंघ अनेक वर्षांपासून युतीत शिवसेनेच्या वाट्याला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ लाही सेनेने येथून निवडणूक लढविली. तर मागीलवेळी २०१४ ला शिवसेनेच्या कोट्यातून महायुतीतील ‘रिपाइं’ला मतदारसंघ मिळाला; पण सध्या ‘रिपाइं’ भाजपबरोबर आहे. त्यामुळे दहा वर्षांनंतर सेना साताऱ्यातून निवडणूक लढण्यास तयार आहे. मात्र, भाजपही मतदारसंघ आमच्याकडे राहणार म्हणून पूर्ण तयारीने निवडणुकीत उतरली आहे.सातारा मतदार संघाचा विचार करता शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद निश्चितच जास्त आहे. या बळावरच भाजपने सेनेपेक्षा आधीपासूनच सातारा मतदारसंघ लढविण्याची तयारी केली होती. तर युती झाल्यापासून शिवसेना रणांगणात खºया अर्थाने उतरली. भाजपकडून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर इच्छुक आहेत; पण भाजपमध्ये आलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तर मतदारसंघ पिंजून काढला. दररोज त्यांच्या बैठका, गाठीभेटी होत आहेत. त्या तुलनेत शिवसेना मागे राहिली. कारण, सेनेत तीन-चारजण इच्छुक होते. आतातर भाजपमध्ये असणारे पुरुषोत्तम जाधव यांनी शिवबंधन बांधले आहे. पाच वर्षांनंतर त्यांची घरवापसी झाली आहे. घरवापसी सेनेची उमेदवारी मिळणार म्हणूनच आहे. तर युतीचा मीच उमेदवार, अशा पद्धतीनेच त्यांनी तीन वर्षांपासून मतदार संघात भेटी-गाठी सुरू केलेल्या. तर भाजपचे इच्छुक नरेंद्र पाटील हे मुंबईतील हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. हे दोघेही राष्ट्रवादीसाठी डोईजड आहेत.सेना-भाजपही निष्ठावंतांसाठी आग्रहीयुतीच्या घोषणेनंतर शिवसेनेने खºया अर्थाने निवडणुकीची तयारी केली. त्यापूर्वी फक्त निवडणूक लढविणार, असे सांगितले जात होते. साताºयात सेनेची बैठक झाली. त्यावेळी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगत निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी झाली तर भाजपनेही बैठकीत निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नावाचा ठराव केलेला.उदयनराजेंविरोधात जाधव तिसऱ्यांदा..खंडाळा तालुक्यातील पुरुषोत्तम जाधव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. निवडणुकीत पराभूत होऊनही ते मतदारसंघात फिरतच असतात. आता शिवसेनेकडे मतदारसंघ राहिल्यास जाधव यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे झाल्यास जाधव आणि खासदार उदयनराजे भोसले हे तिसºयांदा निवडणुकीत समोरासमोर येणार आहेत.