सातारा , दि. २७ : शहराच्या वाढे फाटा परिसरातील मंगलमूर्ती सोसायटीमधील सात ते आठ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत.
विभा कदम (वय ३०) यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याच सोसायटीमध्ये आणखी सातजणांना लागण झाली असून आरोग्य अधिकाऱ्यानी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.
सकाळपासून परिसरात औषध फवारणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंगलमूर्ती सोसायटीमध्ये साथीच्या आजाराने अनेकजण आजारी पडले होते. विभा कदम यांनी रक्त तपासल्यानंतर डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, इतर रुग्णांवर घरामध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी पाचशे एक पाटीजवळ एक युवक डेंग्यूसदृश्य सापडला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यालाही डेंग्यूची लागण झाल्याचे अखेर निष्पन्न झाले. सातारा पालिकेनेही यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाला सतर्क केले असून, संबंधित परिसरात औषधांची फवारणी करण्यात येत