राज्यातील गावांचा अंधार आता दूर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:47 PM2021-07-20T16:47:13+5:302021-07-20T16:49:46+5:30

Mahavitran Satara : ग्रामपंचायत हद्दीमधील सार्वजनिक वीज पुरवठा थकित वीज बिलापोटी तोडला होता, तो पूर्ववत जोडण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाच्यावतीने विभागाला देण्यात आले आहेत.

The darkness of the villages in the state will now be removed! | राज्यातील गावांचा अंधार आता दूर होणार!

मुंबई येथे सरपंच परिषदेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नितीन पाटील, अड. विकास जाधव आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देवीज जोडण्या पूर्ववत करण्याच्या सूचनासरपंच परिषदेच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी

सातारा : ग्रामपंचायत हद्दीमधील सार्वजनिक वीज पुरवठा थकित वीज बिलापोटी तोडला होता, तो पूर्ववत जोडण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाच्यावतीने विभागाला देण्यात आले आहेत.

दरम्यान ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक रस्त्यांवरील बिल बिल भरणे शक्य नसल्याचा मुद्दा सरपंच परिषदेत मांडला त्याबाबत नेमके धोरण ठरविण्या संदर्भात तज्ञांची समिती नेमण्यात आली असून १५ ऑगस्ट पूर्वी ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवारी (दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये ग्रांपंचायतीच्या समस्या बाबत प्रदीर्घ व सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व सबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आला आहे. यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाले असून सरपंच वर्गामध्ये कमालीचा आनंद पसरला आहे.

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍड. विकास जाधव सर्व राज्य पदाधिकारी विश्वस्त यांच्या वतीने सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटले.

या शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विदयुत पंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषद मुंबई राज्यात आक्रमक झाली होती. त्या आनुशंगाने सरपंच परिषदेने राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली होती. तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती व लाखो लोक अंधारात होती.

यामुळे राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात गावकर्यांचा व सरपंच परिषदेचा रोष होता; परंतु आजच्या या बैठकीत महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात आला आहे.


पुन्हा अनेक गावात वीज पुर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे. तसेच या पुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक असे आश्वासन दिले आहे. याबद्दल मी सरपंच परिषदेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.
- नितीन पाटील,
जिल्हा अध्यक्ष,सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), सातारा.

महाराष्ट्रातील एकूण बिलाची होणार तपासणी

महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतींची या बिलाबाबत तक्रार आहे. विज बिल भरून देखील दंड आकारला गेल्याचा ग्रामविकास विभागाचा आरोप आहे. या सर्व बिलांची चौकशी करण्यासाठी वेगळी समिती देखील नेमण्यात आलेली आहे.
 

 

Web Title: The darkness of the villages in the state will now be removed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.