प्रमोद सुकरे ।कºहाड : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कºहाडला प्रीतिसंगमावर जणू राजकीय आखाडाच रंगला होता. सातारा, सांगली अन् माढा या तिन्ही मतदार संघांतील राजकीय घडामोडीचे केंद्र कºहाड ठरले होते.साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी कºहाडात बराच वेळ दिला.सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. दुपारी काँग्रेसमधील नाराजांची पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर मनधरणी केली. नंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. ते उरकून साताऱ्याला गेले. सायंकाळी पुन्हा सात वाजता कºहाडात येऊन त्यांनी नगरसेवकांची बैठक घेतली.
गत निवडणुकीत कºहाड व मलकापूर शहरात उदयनराजे भोसले सुमारे तीन हजार मतांनी पिछाडीवर होते. पुरुषोत्तम जाधवांच्या किटलीतील चहाचा त्यांना चांगलाच चटका बसला होता. त्यामुळे त्यांनी याठिकाणी चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे.दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कºहाडात तळ ठोकला असून, पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील घडामोडींवर त्यांनी लक्ष ठेवून महागठबंधन बळकट करण्याचे प्रयत्न आहेत.आता जिल्हाध्यक्ष कोण!आमदार आनंदराव पाटील यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी अनेकांनी बºयाच कूरघोड्या केल्या. त्यानंतर पाटलांनी राजीनामा दिल्यावर फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची येथे वर्णी लागली. मात्र त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरल्यानंतर रिक्त जागेवर आता नवा जिल्हाध्यक्ष कोण? अशी चर्चा दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात सुरू होती.म्हणे दोन महिन्यांचा पाहुणा...रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा पद्भार जंगी कार्यक्रम घेऊन स्वीकारला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी भाषणे करताना त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले होते. कºहाडच्या काँग्रेस मेळाव्यातही त्यांनी आपला बाणा दाखविला; पण त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर नवा अध्यक्ष दोन महिन्यांचा पाहुणाच ठरल्याची चर्चासुरू झाली.पृथ्वीबाबा-जयकुमारंची कमराबंद चर्चा!सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार जयकुमार गारे यांचे मित्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या राजीनाम्याची व भाजप प्रदेशाबाबतची पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. याबाबत पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी पृथ्वीबाबांना छेडले. मात्र त्यांनी त्यावर न बोलणे पसंत केले. त्यानंतर एका हॉटेलात पृथ्वीबाबा व जयकुमार गोरे यांची सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली. बैठक झाल्यावर पृथ्वीबाबा निघून गेले; पण जयभाऊंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.मोहनशेठ, विश्वजित पृथ्वीबाबांच्या भेटीलासांगली मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. याबाबत पृथ्वीबाबांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता, तो तिढा लवकरच मिटेल, असे सांगितले. मात्र त्यासाठीच आमदार मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम हे दोघेही कºहाडला पृथ्वीबाबांना खास भेटायला आले होते; पण बैठकीचा तपशील समजला नाही. दरम्यान, रात्री उशिरा विरोधी गटातील काँग्रेस नेत्यांची बैठक कºहाडला पृथ्वीबाबांच्या बंगल्यावर होणार होती.