खंडाळा (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मंगळवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून खून करुन मृतदेह घाटात टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे . खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटाच्या मध्यावर खोल दरीत पुरुष जातीचा मृतदेह असल्याची माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरिक्षक प्रकाश सावंत यांनी पोलिस कर्मचाºयांसमवेत घाटाकडे धाव घेतली. घाटाच्या खोल दरीत उतरून मृतदेहाची पाहणी केली असता अंदाज ४० ते ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह असल्याचे समोर आले. मृतदेहाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. मृतदेहाच्या शेजारीच वायर आढळून आल्याने याच वायरने गळा आवळला असल्याचा संशय आहे. अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी हा मृतदेह दरीत टाकला असल्याची शक्यता आहे. मृतदेह खून करुन कारमधून घाटात आणला. तो दरीत टाकताना कारमधील मॅटही दरीत पडलेली आढळून आली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी खंडाळा पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले. शेवटी क्रेनच्या सहाय्याने दीड तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस निरिक्षक प्रकाश सावंत तपास करीत आहेत . घाटात बघ्यांची गर्दी खंबाटकी घाटात मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असतानाच काय घडले या उत्सुकतेपोटी महामार्गावरील प्रवासी थांबून पाहात होते. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दाट झाडांमुळे घाटाचा वापर खंबाटकी घाटात यापूर्वीही अनेकदा मृतदेह आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: पुणे, मुंबई येथील व्यावसायिक, ठेकेदार यांचाही त्यात समावेश होता. खंबाटकी घाटातील दाट झाडीचा वापर अशा घटनांसाठी होत असतो. त्यामुळे पोलिसांना नेहमी सतर्क राहावे लागते. यापैकी अनेक घटनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. |
खुनानंतर मृतदेह खंबाटकी घाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:54 PM
खंडाळा (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मंगळवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून खून करुन मृतदेह घाटात टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे . खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटाच्या मध्यावर खोल दरीत पुरुष जातीचा मृतदेह असल्याची माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरिक्षक प्रकाश सावंत यांनी पोलिस ...
ठळक मुद्देकारमधून आणला मृतदेह गळा आवळून मारल्याचा पोलिसांना संशयदाट झाडांमुळे घाटाचा वापर घाटात बघ्यांची गर्दी