शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

डोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 4:56 PM

कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देडोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्याघारेवाडीतील घटना : न्यूमोनियाने तीन दिवसांपूर्वी मृत्यू

कुसूर/कऱ्हाड  : कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत  कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.घारेवाडी येथील वनक्षेत्रालगत दुतोंडी नावाच्या डोंगर पायथ्याला लांगड तळी नावाच्या शिवारात बिबट्या मरून पडल्याचे एका गुराख्याच्या निदर्शनास आले. गुराख्याने याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बंडगर यांना दिली.

बंडगर यांनी वनरक्षक रमेश जाधवर यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक भोईटे, मानद वन्यजीव रक्षक रोहण भाटे, पशुवैद्यकीय अधिकारी संजय हिंगमिरे, वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक रमेश जाधवर, कविता रासवे, मंगेश वंजारी, वनमजूर अरुण शिबे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.दोन ते अडीच वर्षांची मादी बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्याच्या नख्या, मिशा, दात व इतर सर्व अवयव सुस्थितीत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता न्यूमोनियाने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला. तीन ते चार दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. रविवार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर जखिणवाडी बिटाअंतर्गत असलेल्या वनक्षेत्रात दहन करण्यात आले.तिसऱ्या बिबट्याचा बळीगत दोन वर्षांत याच वनक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. गत दोन वर्षांपूर्वी कुसूर वनक्षेत्रामधील ह्यबिंदीह्ण नावाच्या शिवारात मृत बिबट्या आढळला होता. तर गतवर्षी अन्नाच्या शोधात आलेला बिबट्या बामणवाडी येथील भरवस्तीमधील विहिरीत पडून मृत पावला होता.वनमजुरांचे अथक परिश्रमघारेवाडी येथे सडलेल्या अवस्थेत सापडलेला मृत बिबट्या अडचणीतून बाहेर काढून गाडीत ठेवण्यापर्यंत अन्य कर्मचाऱ्यांसह वनमजूर अरुण शिबे यांनी मोठे परिश्रम घेतले. कोळे बिटाअंतर्गत असलेले वनमजूर अरुण शिबे हे तालुक्यातील अन्य बिटातील वनक्षेत्रात घडलेल्या प्रत्येक घटनेवेळी मोलाचे परिश्रम घेताना दिसतात. 

टॅग्स :leopardबिबट्याSatara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग