मेढा : जावळी तालुक्याच्या दक्षिण विभागातील डोंगरमाथ्यावर सांगवी गावच्या हद्दीत स'ाद्रीनगरच्या झोरे वस्तीजवळ चिपाचा दगड नावाच्या शिवारात १२ वर्षांच्या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे व त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी अग्नी देऊन त्याचे दहन केले.याबाबत वनविभागाचे अधिकारी सचिन डोंबाळे यांनी सांगितले की, स'ाद्रीनगरमधील एका ग्रामस्थांमार्फत शिवारात वन्य प्राण्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. तो वन्य प्राणी बिबट्या आणि कुजलेल्या अवस्थेत होता.
साधारण १५ ते २० दिवसांपूर्वीच वयोमानाने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचे वय साधारण १२ वर्षांचे असून, भुकेनेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. आपल्या जंगलात बिबट्या असल्याचे हा प्रखर पुरावा असून, बिबट्या जंगलात असणे हे चांगले लक्षण आहे, असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
हा बिबट्या आमच्या शेतीच्या परिसरातील जंगलाच्या ठिकाणी वास्तव्यास होता. त्यामुळे आमच्या शेतीचे रानडुक्कर, माकड आदी वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान गेली आठ ते दहा वर्षे झाले नव्हते, असेही ग्रामस्थांनी सांगितले.