मलकापूर : पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर महामार्गाच्या अवजड वाहतूकीसह शहरातील वाहतूक एकाच जागेवरून येजा करत असल्यामूळे या ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. याठिकाणी दिवसातून किमान एक दोन लहान मोठे अपघात घडत असतात. उड्डाणपूल रखडल्याने आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटे आंब्याचा ट्रक उलटल्याने पुन्हा एकदा हे अधोरेखीत होत आहे.कराड शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी कराडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरील अवजड वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढत महामार्गावरून कराडमध्ये प्रवेश करताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेवूनच प्रवेश करावा लागतो.
कोल्हापूरडून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असलेल्या लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे कराड शहरात येणारी वाहने व पुढे सातारा तसेच पुणे, मुंबईकडे जाणारी वाहने एकाच लेनवरून धावत असतात. महामार्गावर सातारा, पुणे बाजूकडे जाणारी वाहने भरधाव वेगात असतात. तर शहरात येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला असतो. आशा परिस्थितीत अनेकवेळा अपघात घडले आहेत. अशा अपघातात महामार्ग चौपदरीकरणानंतर आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कांही महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या बालिकेला जिव गमवावा लागाला होता. तर काले येथील वृद्ध दांपत्य जागिच ठार झाले. आशा जीवघेण्या अपघातांसह सोमवारी आंब्याचा ट्रक उलटी होऊन झालेल्या अपघातासारखे छोटे मोठे आपघात नेहमीच घडतात. सुदैवाने या आपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. यापूढेही उड्डाणपूलाच्या प्रतिक्षेत आनखी किती जणांना जीव गमवावा लागेल असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.