शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
2
"मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
3
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
4
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
5
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
6
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
8
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
9
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
10
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
11
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
12
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
14
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
15
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
16
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
17
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
18
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
19
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
20
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

साखरपुड्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू

By admin | Published: February 13, 2015 10:37 PM

खिंडवाडी येथील घटना : ट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक

सातारा : साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या कर्नाटक येथील नवरदेवाचा खिंडवाडी येथे शुक्रवारी सकाळी दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.धवलसाहब कासमसाहब कुंभार (वय २७, रा. आधरगंज, ता. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक) असे ठार झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धवलसाहब हा कर्नाटक येथील कंटेनरवर (केए ५१ बी ११४४) चालक म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे कर्नाटक येथील एका मुलीशी लग्न ठरले होते. रविवारी त्याचा साखरपुडा होता. त्यामुळे त्याने कर्नाटकला माल घेऊन जातो, असे मालकाला सांगितले. त्याचा साखरपुडा असल्याने मालकानेही त्याला परवानगी दिली.पुण्याहून शुक्रवारी मध्यरात्री धवलसाहब आणि क्लिनर कंटेनर घेऊन कर्नाटककडे रवाना झाले. सकाळी पावणेसातच्या सुमारास ते खिंडवाडीजवळ आले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मालट्रक (एमएच ०९ सीए ४४७१) थांबला होता. यावेळी धवलसाहबचा कंटेनरवरचा अचानक ताबा सुटल्याने कंटेनर ट्रकवर पाठीमागून जोरदार आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक आणि कंटेनरचा भाग एकमेकांत अडकला. त्यामुळे चालक धवलसाहब याचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना बाहेर काढण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक एम. यू. वैराटकर, हवालदार बशीर मुलाणी, प्रशांत शेवाळे, मदन मुळे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालक धवलसाहब याला कंटेनरमधून मृतावस्थेत पोलिसांनी बाहेर काढले. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्यासोबत असलेला क्लिनर मात्र किरकोळ जखमी झाला. (प्रतिनिधी)