कऱ्हाड तालुक्यात फेब्रुवारी अखेरपासून कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. गत काही दिवसांपासून तर दिवसाला शंभरवर बाधित आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, बाधितांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार शुक्रवारी तालुक्यातील नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिखली येथील महिला, मलकापूर येथील दोन पुरुष, अभयचीवाडीतील पुरुष, घारेवाडीतील महिला, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठेतील महिला, गोळेश्वर येथील युवक, सैदापूर येथील पुरुष, ओंड येथील महिलेचा समावेश आहे. त्याबरोबरच १२५ जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
शहरातील शुक्रवार पेठेतील २, शनिवार पेठ ४, सोमवार पेठ २, माळी कॉलनी १, दत्त चौक १, कार्वे नाका १, इतर १९ तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यानगर येथील ९, विजयनगर ३, कोडोली १, मलकापूर १०, खुबी १, काले १, कासारशिरंबे ३, कोयना वसाहत ७, टेंभू १, नांदगाव ३, रेठरे बुद्रूक १, कोर्टी १, कार्वे १, ओगलेवाडी ५, चरेगाव १, येरवळे १, घोगाव १, तांबवे १, ओंड २, वारुंजी १, उंब्रज १, चोरे १, कापिल १, टेंभू ३, तासवडे १, शेणोली १, सदाशिवगड १, शेवाळेवाडी-उंडाळे २, तळबिड १, उंब्रज १, शेरे ८, वनवासमाची ३, गोळेश्वर १, अरेवाडी १, मुंढे १, हजारमाची ३, पार्ले १, पोतले १, काले ३, जखीणवाडी १, नडशी १, सुपने १ आणि वडगाव हवेली येथील चारजणांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.