सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची आणि बाधितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ८७ वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी ३७१ नवीन बाधित वाढले. यामुळे बाधितांचा आकडा ३८ हजार ७१८ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात गुरुवारी रात्री ५३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खेड, (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, धावडी, (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय महिला, किकली, (ता. वाई) येथील ८४ वर्षीय पुरुष, मदनेवाडी, (ता. पाटण) येथील ५८ वर्षीय पुरुष, चाहूर, (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, दहिवडी, (ता. माण) येथील ५७ वर्षीय पुरुष, कंजरवाडी देगाव, (ता. सातारा) येथील ८९ वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका, (ता.सातारा) येथील ७४ वर्षीय महिला, पिंपरी, (ता. कोरेगाव) येथील ५० वर्षीय पुरुष, फलटण येथील ५५ वर्षीय महिला, सोनवडी, (ता. फलटण) येथील ६० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी, (ता. फलटण) येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बुधवार पेठ फलटण येथील ६८ वर्षीय पुरुष, भुर्इंज, (ता. वाई) येथील ६९ वर्षीय पुरुष, बिदाल, (ता. माण) येथील ४६ वर्षीय महिला, बोंडारवाडी, (ता. महाबळेश्वर) येथील ५८ वर्षीय पुरुष, कोर्टी, (ता. कराड) येथील ६४ वर्षीय पुरुष, मोल, (ता. खटाव) येथील ५४ वर्षीय पुरुष, निजरे, (ता. सातारा) येथील ५३ वर्षीय पुरुष, कासरशिंरबे, (ता.कऱ्हाड ) येथील ७२ पुरुष, रविवार पेठ कऱ्हाड येथील ७० वर्षीय पुरुष, चिंचणी, (ता. कडेगाव सांगली) येथील ५६ वर्षीय पुरुष, गोवारे, (ता. कऱ्हाड ) येथील ८० वर्षीय महिला, चोरमारवाडी, (ता. कऱ्हाड ) येथील ६५ वर्षीय पुरुष, जिंती औंध, (ता. कऱ्हाड ) येथील ७२ वर्षीय पुरुष, विसापूर, (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, गिरवी, (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ५९५जण मुक्त झाले तसेच आत्तापर्यंत २८ हजार ६५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.