मायणी : मायणीतील मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी होणारे सामुदायिक नमाज पठण एकत्र येऊन न करता घरामध्येच नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याबाबत मुस्लीम बांधवांना सूचना देण्यासाठी मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी मुस्लीम समाजबांधवांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी गोसावी म्हणाले, ‘रमजान ईद घरीच साजरी करण्यात यावी, नमाज पठणासाठी एकत्र येऊ नये, मौलाना व मुस्लीम समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जनजागृती करून नमाजपठण घरी करण्यास प्रवृत्त करावे.’ यासह विविध सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, असिफ जमादार, समीर बागवान, इब्राहिम तांबोळी, पापालाल नदाफ, सादिक नदाफ, डॉ. गौस तबीब, गणीबाबु मुल्ला, सईद बागवान, बाबालाल शेख, मक्सूद बागवान आदी प्रमुख उपस्थित होते.
१२मायणी
मायणी पोलीस दूरक्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित मुस्लिम समाजबांधव. (छाया : संदीप कुंभार)