शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

By नितीन काळेल | Published: November 08, 2023 6:48 PM

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडला आहे. शेती पिकवणे अवघड झाले आहे. अशा सततच्या संकटाने शेतकरी कर्जबाजारी झाला ...

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडला आहे. शेती पिकवणे अवघड झाले आहे. अशा सततच्या संकटाने शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सातारा जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने करण्यात आली आहे. यासाठी पोवाई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाही काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.याबाबत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्य शासनाने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा या दोन तालुक्यांच्या समावेश आहे. पण, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, सोयाबीनला १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा. उसाला टनाला चार हजार रुपयांचा दर मिळावा, शेतकऱ्यांना वीज मोफत द्यावी, शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करुन वसुली थांबवावी. जिल्ह्यात असणाऱ्या धरणातील पाणीसाठा येथीलच लोकांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, उपनेत्या छाया शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम, संजय भोसले, रामदास कांबळे, हणमंत चवरे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार..जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर प्रा. बानुगडे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी प्रा. बानुगडे-पाटील यांनी माराठा आरक्षणासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत समाजाला आरक्षण मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेवरही त्यांनी भाष्य केले. शिंदे गटाचे आमदार ३१ डिसेंबरपूर्वीच अपात्र ठरतील, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळ