आदर्की : हिंगणगाव, ता. फलटण ग्रामपंचायत हद्दीतील सूळवस्ती येथील प्रीमियम चिक फिड्स परिसरात कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी परिसरात दि. ११ जूनपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.
हिंगणगाव, ता. फलटण ग्रामपंचायत हद्दीत आदर्की रोडला सूळवस्ती येथे प्रीमियम चिक फिड्स पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी स्थानिक व परराज्यांतील कामगार आहेत.
गत आठवड्यात कोरोना चाचणीत ३९ कामगार कोरोनाबाधित मिळाले. त्यानंतर, सूळवस्ती येथील ११ जण कोरोनाबाधित आढळल्याने फलटण उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून दि. ११ जूनपर्यंत जाहीर केले. पोल्ट्री फार्ममध्ये ३९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, १८ जण हिंगणगाव विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सूळवस्ती येथील प्रीमियम चिक फिड्सला तातडीने भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या. हिंगणगाव आरोग्य उपकेंद्राचे डॉ. राहुल माने व कर्मचारी उपचार करीत आहेत.
सर, कृपया वरील बातमी जुनी आहे की, बातमीतील तारीख ११ जून की ११ जुलै कृपया तपासून घेणे...