खटाव : कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे कांद्याचे उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्याऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सध्या खटाव व भुरकवडीच्या सीमेवर अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांदा कांद्याची पसर केलेली दिसून येत आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. गेल्यावर्षी या कांद्याला २० ते ३० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी होता. परंतु चालूवर्षी या कांद्याला जागेवर कांदा पाहून नऊ ते दहा रुपये प्रति किलो, असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मूळ भांडवल तर सोडाच हाती काहीच रकम मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतकरी त्रस्त झाला असताना कांद्यावर पडलेला रोगामुळे औषधे फवारणी आदींचा झालेला खर्च पाहता शेतकऱ्याला दरवर्षीपेक्षा माल कमी निघत असल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. भुरकवडीच्या माळावर कांद्याची पसर शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु सध्या वातावरणात बदल होत असून, पावसाळी वातावरणामुळे कांदा सुकण्याऐवजी हा कांदा खराब होत आहे. त्या मुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर कांद्याला दर नसल्यामुळे व्यापारी फिरकत नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी उकिरड्यामध्ये भरला आहे.
चाैकट..
भांडवल निघणेही कठीण...
एका एकरात दीडशे पिशव्या निघणाऱ्या शेतात पन्नास ते पंच्याहत्तर पिशव्या निघत असल्यामुळे कमी निघणाऱ्या मालामुळे तसेच हवामानातील बदलामुळे कांदे व्यवस्थित पोसले गेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जेवढे भांडवल घातले आहे, ते सुद्धा निघणे कठीण झाले आहे. एकरी पन्नास हजार रुपये खर्च या कांद्यासाठी येत असून, यावर्षीच्या दरामुळे अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांवर आली आहे.
२४ खटाव
कांद्याला दर नसल्यामुळे भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी उकिरड्यामध्ये भरला आहे.