सूर्यकांत निंबाळकर - आदर्कीफलटण पश्चिम भागात १९७२ मध्ये मोठ्या प्रमाणात पाझर तलाव बांधण्यात आले. त्यानंतर १९८२ मध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले. परंतु त्याची देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे त्याची पडझड व गाळ साठला. त्यामुळे पाणी साठा होत नव्हता. म्हणून संबंधितांनी त्या बंधाऱ्याची उंची कमी केली. संबंधितांनी हा प्रकार चक्क पैसे वाचविण्यासाठी केला असल्याचा आरोप होत आहे. परंतु लघु पाटबंधारे विभाग बंधाऱ्याची उंची कमी करुन लाखो लिटर पाणी वाया घालवत असल्याचे चित्र दिसत आहे.फलटण पश्चिम भाग दुष्काळी व डोंगराळ असल्याने प्रत्येक ओढ्यावर पाझर तलावासाठी जागा उपलब्ध असल्याने १९७१ मध्ये दिवंग चिमणराव कदम पायी दौरा करुन अधिकारी सोबत घेऊन जागेवरच प्रशासकीय मंजुरी घेत हजारो लोकांना दुष्काळात हाताला रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करुन दिले. त्यामुळे भूगर्भातील पाणी भरुन येऊन विहिरींना फायदा झाला. काही ठिकाणी बंधाऱ्यातून पाण्याने हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. परंतु कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात गाळ साठला. तर काही बंधाऱ्यांचा भाग वाहून गेला. त्यानंतर शासनाने २० वर्षांनंतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती करताना काँक्रीटीकरण करण्यासाठी ४ ते ५ लाख रुपये खर्चास मान्यता दिली. त्यावेळी फलटण पश्चिम भागात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करताना बंधाऱ्याची उंची कमी केली. तर बंधाऱ्यांच्या कामात सिमेंट, वाळू, ग्रीट, खडी कमी प्रमाणात वापरल्यामुळे जुन्या बंधाऱ्याची गळती राहिली तर बंधाऱ्यांची उंची कमी केल्यामुळे पाणीसाठा कमी झाला. या प्रकाराची चौकशीची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बंधाऱ्याची उंची कमी केल्याने पाणीसाठ्यात घट !
By admin | Published: July 12, 2015 9:57 PM