शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वाई मॅप्रो कोरोना रुग्णालयाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:40 AM

वेळे : शेंदुरजणे, वाई येथील मॅप्रो कोरोना रुग्णालयाचे लोकार्पण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख ...

वेळे : शेंदुरजणे, वाई येथील मॅप्रो कोरोना रुग्णालयाचे लोकार्पण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. हे हॉस्पिटल आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहे.

या रुग्णालयात तीस ऑक्सिजन व सहा व्हेंटिलेटर बेड आहेत. एक्स रे मशीन, रॅपिड अँन्टिजन टेस्टची सुविधा, नऊ डॉक्टर, २५ कर्मचारी, वातानुकूलित शवपेटी या सुविधा येथे उपलब्ध आहेत. सुरुवातीला येथे ३६ रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत. नंतर यामध्ये वाढ करण्यात येईल. सरासरी ६० बेडपर्यंत संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आमद‍ार मकरंद पाटील यांनी सांगितले.

या इमारतीच्या तळमजल्यावर सध्या ही व्यवस्था करण्यात आली आहे. अजून दोन मजल्यांवर बेड व्यवस्था करण्यासाठी येथे पर्याप्त जागा उपलब्ध आहे. यामध्ये आणखी २५ ऑक्सिजन बेडचे काम सुरू आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील १५ दिवस आमदार मकरंद पाटील सातत्याने प्रयत्नशील होते. प्रशासनाला सोबत घेऊन हे रुग्णालय उभारण्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. याकामी मॅप्रो, गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड, वाई नगरपालिका व मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, वाई मिशन हॉस्पिटल आदींचे सहकार्य लाभले आहे.

या वेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, डॉ. संदीप चव्हाण, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्या पोळ, सारंग पाटील, महादेव मस्कर आदी उपस्थित होते.