कºहाड (जि. सातारा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दसºयाच्या मुहूर्तावर गूळ सौद्यांना प्रारंभ झाला आहे. गुळाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकºयांची यंदाची दिवाळी गोड होण्याची चिन्हे आहेत.
कºहाड येथील बाजार समितीत गुळाची आवक सुरू झाली असून दसºयाच्या मुहूर्तावर सौद्यांना प्रारंभही करण्यात आला आहे. सभापती अमृतराव पवार यांच्या हस्ते नवीन गूळ व शेतीमालाच्या सौद्यास प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या गुळाच्या सौद्यास सुमारे चार हजारांचा भाव मिळाला. यावेळी, संचालक जे. बी. लावंड, जयंतीलाल पटेल, सचिव बी. डी. निंबाळकर व तसेच आडते व्यापारी यांची उपस्थिती होती.
गुळाची आवक वाढल्याने गतवर्षी दरही कमी झाला होता. यावर्षी सुरुवातीलाच विक्रमी भाव मिळाल्याने शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कºहाडच्या बाजार समितीत कºहाड, पाटण तालुक्यासह इतर तालुक्यांतून गुळाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. चांगल्या प्रतीचा गूळ येथे मिळत असल्याने आडत व्यापाºयांकडून येथील गुळाला मोठी मागणी असते.
दरवर्षी दसºयाच्या मुहूर्तावर सौद्यांना प्रारंभ होतो. यावर्षीही सौदे सुरू झाले असून, काही दिवसांतच गुळाची आवक वाढेल, असा विश्वास बाजार समितीच्या संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र गुºहाळगृहांची घरघर सुरू झाली आहे. कारखान्यांच्या अनिश्चित दरांमुळे शेतकºयांचा गुºहाळगृहांकडे ओढा वाढला आहे. त्यातच चांगला दर मिळत असल्याने गुळाच्या सौद्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.