पाचगणी : कोरोनाचा फटका शेती व्यवसायालाही बसला आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतक-यांना परदेशातून मार्च-एप्रिलमध्ये रोपांची मागणी करावी लागते. शेतक-यांनी ही मागणी सोसायट्याच्या माध्यमातून केली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने परदेशातून नव्याने रोप आयात करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या स्ट्रॉबेरी रोपांतूनच पुन्हा रोपे करून लागवडीचे रोपनिर्मिती करण्यावर शेतकºयांची मदार आहे.
सध्या सर्व जगच कोरोनामय झाल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतेने ग्रासला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने पाचगणी, महाबळेश्वर परिसरात १५ मार्चपासूनच लॉकडाऊन झाला आहे. संपूर्ण महाबळेश्वर तालुका पर्यटकांसाठी बंद झाला. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा शेवटचा हंगामही शेतातच पडून राहिला. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे लागवड उशिरा झाली. त्यात वर्षभर लहरी हवामानाच्या गर्तेत शेतकरी सापडला. त्यातच मार्च महिन्यापासून झालेला कोरोनाचा संसर्ग त्यामुळे स्ट्रॉबेरीचा पूर्ण हंगाम शेतक-यांना घेताच आला नाही.
या वर्षाच्या हंगामाची तयारी म्हणून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतक-यांनी सोसायट्यांच्या माध्यमातून परदेशातून रोपांच्या मागणीचे बुकिंग करून ठेवले आहे. परंतु संपूर्ण जगच कोरोनाने व्यापले असल्याने खरिपाचा हंगाम सुरू होतांना परदेशातून रोपे उपलब्ध होतीलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे काही शेतक-यांनी उपलब्ध खोडव्यांतून पुन:रोप प्रक्रिया माध्यमातून रोपनिर्मिती करण्याचा बी प्लॅन करून स्ट्रॉबेरी रोपनिर्मिती करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु या खोडव्याच्या माध्यमातून निर्मिती केलेल्या रोपांची उत्पन्नाच्याबाबतीत विश्वासार्हता देता येत नाही.महाबळेश्वर तालुक्यात पर्जन्यमान जास्त असल्याने अशी रोपनिर्मिती केली जात नाही. ही रोपनिर्मिती जावळी, वाई, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांमधून प्रमुख्याने केली जाते.रोपे आणण्यासाठी प्रयत्न आवश्यकसध्या ज्या देशामधून स्ट्रॉबेरी रोपे आयात केली जातात, त्या अमेरिका, स्पेन, इटली या देशांमध्ये प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला आहे. लागवडीची रोपे वेळेवर उपलब्ध होण्याकरिता शासनपातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कोरोनाचं संकट वेळेत टळलं तर परदेशातून रोप येऊ शकतात. रोप येण्यास उशीर झाला तर खोडव्यापासून रोपनिर्मिती हा पर्याय आहे. त्यालाही मर्यादा असल्याने परदेशातून रोप उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे.- मोहन पवार, सनपाने, ता. जावळी.खोडवा हा अंतिम पर्याय आहे. त्यापासून अधिक उत्पादन मिळेल, असे नाही. राज्य शासनाने स्ट्रॉबेरीची रोपे आयात करून त्याचा शेतकºयांना पुरवठा करावा. जेणेकरून भविष्यातील मोठे नुकसान टळेल. आमचाही यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - किसनशेठ भिलारे,अध्यक्ष, फळे, फुले, भाजीपाला खरेदी-विक्री संघ, महाबळेश्वर.