सातारा : रमजान महिन्याच्या उपवासासाठी (रोजे) मध्ये विविध खाद्य पदार्थांना मोठी मागणी असते. खास करून उपवास सोडण्यासाठी हे खाद्य पदार्थ शक्यतो तयार केलेले पदार्थ जास्त चालतात म्हणून साताऱ्यातील काही व्यावसायिकांनी चोखंदळ ग्राहकांसाठी दिल्लीचा मेवा व लखनवी कबाबची व्यवस्था केली आहे. हे खरेदी करण्यासाठी सायंकाळी या स्टॉलवर मोठी गर्दी होत आहे.मुस्लीम समाजाला पवित्र महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. या संपूर्ण महिन्यात उपवास (रोजे) ठेवण्यात येते. रोजा सोडताना मश्जिद व घरामध्ये एकत्र बसून उपवास सोडले जाते. यावेळी ताटात विविध खाद्य पदार्थ वाढण्यात येते. अगदी फळभाज्यापासून विविध मासांहरच्या डिशेस यामध्ये समाविष्ट असतात. उपवासासाठी बाजारात भेंडखजूरपासून मासांहरचे विविध पदार्थ तयार करण्यात येत आहे. शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजेच शनिवार पेठ येथील मश्जिदजवळ सायंकाळी ग्राहकांची मोठी गर्दी होते. याठिकाणी व्यावसायिकांनी रमजान महिन्यासाठी खास भरारी आणून वेगवेगळ्या पदार्थांचा स्वाद ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या साताऱ्यातील या स्टॉलवर ‘रमजान स्पशेल‘ म्हणून मासांहारचे विविध खाद्य पदार्थ तयार मिळत आहे. तर फळांमध्ये सफरचंद, केळीची मागणी वाढली आहे.रोजा सोडण्यावेळी एकमेकांना आमंत्रित केले जाते. त्यामुळे प्रत्येक जण काहीना काही पदार्थ घेऊन येतो. तर नंतर मश्जिदीतील ठेवण्यात आलेल्या मोठ्या ताटात थोडे-थोडे करून वाढण्यात येते. त्यामुळे एकाच ताटात सर्वकाही पदार्थांचा आस्वाद उपवास सोडताना घेता येतो. त्यामुळे या खाद्य पदार्थांची दुकाने सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळेत शहरात थाटतात.(प्रतिनिधी)रमजानसाठी लखनवी भरारीमासांहाराचे विविध खाद्य पदार्थांना रमजान महिन्यातच मागणी असते. त्यामुळे या महिन्यात आम्ही खास करून लखनवी भरारी आणतो. विविध खाद्य पदार्थांना याठिकाणी मागणी आहे. सध्या याठिकाणी दिल्लीचा मेवा व लखनऊ मधील विविध मासांहारीचे डीश आम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असल्याचे व्यावसायिक मुख्तार पालकर यांनी सांगितले.रमजान महिनामधील उपवास ठेवणारेच फक्त हे पदार्थ घेतात, असे नाही जवळपास सर्वच समाजांतील लोक हे पदार्थ खरेदीसाठी येथे येतात. हे पदार्थ फक्त रमजानमध्ये येथे उपलब्ध होत असल्याने याची मागणी वाढत आहे.
दिल्लीचा मेवा अन् लखनवी कबाब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2015 9:46 PM