सातारा : केंद्रीय परिवहन विभागाने ऑटो रिक्षाच्या शुल्क आणि फिटनेस दरवाढ व विलंब प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ रिक्षा युनियन संघटना सातारा शहर यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
रिक्षा व्यावसायिक हा सर्वसामान्य घटकातील असल्याने, त्याचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने आणि बँकेचे हप्ते त्यातूनच भरावे लागतात. त्याचबरोबर, सध्याच्या जीवनशैलीमध्ये खासगी वाहनांची संख्या सतत वाढत असल्याने, रिक्षा प्रवास कमी होत असल्याचे समोर येत आहे. या वाहनांवर लावलेल्या अधिभार हा या व्यावसायिक कामावर अन्याय होणार आहे किंवा त्यांचा व्यवसाय अडचणीत येऊन बेरोजगारी वाढू शकते. रिक्षा वाहनास वर्षाची मुदत पंधरा वर्षे केले आहे, ते वीस वर्षांपर्यंत वाढवावी. त्यावर अधिकार कमी करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्राधिकरणाने विम्याचा हप्ता निश्चित करण्यासाठी तीन चाकी वाहने ते सहा चाकी वाहने असा कट केला आहे. वार्षिक अपघात झालेले क्लेम यांचा विचार केला जातो. रिक्षाचे अपघातांचे प्रमाण एकदम कमी आहे. त्या तुलनेने आणि वाहनाचा अपघात जास्त आहे. त्यामुळे हप्ता निश्चित करताना, जो जास्त भुर्दंड शिक्षा व्यवसायाला पडतो. एसटी महामंडळाच्या गाड्याचा विमा काढला जात नाही. त्यासाठी त्यांचा स्वतंत्र निधी आहे, तरी विमा काढायला लावतात. चालकांना या मंडळात दोन हजार रुपये जमा केले, तर अपघातातील राहिलेले निधीतून रिक्षाचालकांची कल्याणकारी योजना राबवता येतील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, उपाध्यक्ष शशिकांत खरात, सचिव गणेश भिसे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ रिक्षा युनियन संघटना सातारा शहर यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.