......
पंखे दुरुस्त करण्यासाठी गर्दी
सातारा : दिवसेंदिवस उकाडा वाढत असल्याने सातारा शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर कडक ऊन तर रात्रीच्या वेळी उकाडा अधिक वाढत असल्याने पंखे, एसी यांना मागणी वाढली आहे, तसेच एसी, पंखे दुरुस्तीसाठीदेखील दुरुस्तीच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे.
..............
देगाव रस्त्याची दुर्दशा
सातारा : अजिंठा चौकापासून देगावकडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून, रस्त्याची खडी बाहेर आली आहे, तसेच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. याच रस्त्यावर मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत, तसेच देगाव पंचक्रोशीमधील शेतमाल साताऱ्याला न्यायचे म्हटले तरी या रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
..........