पाटण : वीजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करूनही शेतकºयांना अनुदान देण्यासाठी अनेक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याची माहिती सदस्या सुभ्रदा शिरवाडकर यांनी दिली. लोकांना अनुदान मिळवून देण्यासाठी वीजवितरणने तत्काळ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत, अशी मागणी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केली. तर सर्व सदस्यांनी वीजवितरणच्या अधिकाºयांवर ताशेरे ओढले.पाटण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मासिक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती उज्ज्वला जाधव होत्या. यावेळी गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण विभागाचा आढावा देताना निकम म्हणाले, ‘तालुक्यातील ५३२ प्राथमिक शाळांपैकी १९० प्राथमिक शाळांचे बाह्यमूल्यमापन झाले. त्यामध्ये १८५ शाळा ‘अ’ श्रेणीत आहेत. तालुक्यात अद्याप १५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी शिक्षक रिक्त हा विषय सर्व जिल्ह्याचा असून, पाटण तालुक्याला प्रथम प्राधान्य देऊन रिक्त शिक्षक पदे भरली जातील, असे सांगितले. तालुक्यातील दहापेक्षा कमी पट असणाºया चार शाळांच्या पैकी दोन शाळांचे समायोजन करण्यातआले.
वीजवितरण विभागामार्फत तालुक्यातील खराब झालेल्या १०५ पोलची दुरुस्ती करायची आहे. त्यामध्ये पाटण ७५ आणि मल्हारपेठ ३५ अशी संख्या आहे. तसेच अतिधोकादायक असलेल्या ३४० खांबांचे मजबूतीकरण केले जाणार आहे. त्यांना पोलला सिमेंट काँक्रीट केले जाणार असल्याची माहिती वीजवितरण विभागच्या आढाव्यावेळी अधिकाºयांनी दिली. तालुक्यातील बरेच ठिकाणी डिपी बॉक्सला वेलवनस्पतींनी वेढले असून, त्या तत्काळ काढण्यात याव्यात, अशी मागणी सदस्य सुरेश पानसकर यांनी केली. तसेच अनेक ठिकाणी वीजवितरण कंपनीच्या कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे ऊस जळण्याच्या घटना घडल्याबद्दल सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.
कृषी सहायक संख्या कागदावर दिसते; पण प्रत्येक काम करताना आम्हाला कुठे ही दिसत नसल्याची खंत कृषी विभागाच्या आढाव्यावेळी सर्व सदस्यांनी व्यक्त केली. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाºयांनी यावेळी आढावा सादर केला. तालुक्यातील सोलापूर, मुंबई या नवीन गाड्या सुरू करण्याचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. यावर पाटण-नवजा गाड्यांना विद्यार्थ्यांची गर्दी खूपच असल्याने यामार्गावर अधिक बसेस सोडाव्यात, अशी मागणी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केली.सभेवेळी वनविभाग, सामाजिक वनीकरण, पाणीपुरवठा विभाग आदी विभागाचा आढावा अधिकाºयांनी सादर केला.अंगणवाड्यांची तपासणीएकात्मिक बाल विकास विभागामार्फत साठ अंगणवाड्या या आयएसओ मानांकन करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. त्या अंगणवाड्यांची लवकरच तपासणी होणार असल्याची माहिती यावेळी पार पडलेल्या सभेत अधिकाºयांनी दिली. या सभेला अधिकारी उपस्थित होते.पाटणला ‘आरोग्य’ची ९७ पदे रिक्त...पाटण तालुका आरोग्य विभागातील ३३१ पदांपैकी अजून ही ९७ पदे रिक्त असल्याची माहिती डॉ. शिकलगार यांनी सभेच्या आढाव्यावेळी दिली. तसेच कुटुंंबकल्याण योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करणाºया लाभार्थ्यांकडे बँक खाते आणि आधार कार्ड नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करता येत नाही. त्याची कार्यवाही सुरू असल्याचेही डॉ. शिकलगार यांनी सांगितले.