फलटण : फलटण शहर परिसर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी वाळू उपसा होत असतानाही प्रशासनाला तो का दिसत नाही. वाळू माफियांना महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे का, असा संशय यामुळे येत आहे. विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी आझाद पार्टीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी राजरोजपणे अवैधपणे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असतानाही प्रशासन गप्प आहे. सावकारकी करणाऱ्यांना मोक्का लागू शकतो तर वाळू माफियांना तो का लावला जात नाही. विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महादेव गायकवाड, शहराध्यक्ष योगेश माने, उपाध्यक्ष सुनील पवार, युथचे शहराध्यक्ष अक्षय लोंढे, शहर सचिव आदित्य पाटोळे उपस्थित होते.